शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी नागपुरातून करणार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 00:11 IST

अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षाच्या संघटन बांधणीकडे विशेष लक्ष देत असलेले राहुल गांधी हे लवकरच नागपुरात बूथ कार्यकर्त्यांच्या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून ते कॉंग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत निवडणुकीचा बिगुल फुंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांनी नागपुरातील संमेलनास येण्याचे मान्य केले आहे.

ठळक मुद्देविकास ठाकरेंनी दिले बूथ संमेलनाचे निमंत्रण : शहर काँग्रेसचा अहवाल सोपविला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षाच्या संघटन बांधणीकडे विशेष लक्ष देत असलेले राहुल गांधी हे लवकरच नागपुरात बूथ कार्यकर्त्यांच्या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून ते कॉंग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत निवडणुकीचा बिगुल फुंकण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी दिल्ली येथे राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राहुल गांधी यांनी नागपुरातील संमेलनास येण्याचे मान्य केले आहे.विकास ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेत नागपूर शहर काँग्रेसतर्फे गेल्या चार वर्षात राबविलेले उपक्रम, केलेली आंदोलने याचा लेखाजोखा असलेला अहवाल सादर केला. या अहवालात प्रत्येक आंदोलनाशी व उपक्रमाशी संबंधित सचित्र माहिती देण्यात आली आहे. ठाकरे यांनी चर्चेत सांगितले की, नागपूर शहरात १९४५ बूथ असून प्रत्येक बूथवर अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक बूथवर दहा सदस्य नेमण्यात आले आहे. बूथ पदाधिकारी व सदस्यांची संख्या सुमारे २० हजार होते. नागपूर हे देशातील मध्यवर्ती शहर असून येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे आपण येथील २० हजार बूथकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरात यावे, असे निमंत्रण ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिले. ही विनंती राहुल गांधी यांनी तात्काळ मान्य केली व महाराट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व व संघटन महासचिव अशोक गहलोत यांच्याशी चर्चा करून लवकरच कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन दिले, असे ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.गेल्या चार वर्षात शहर काँग्रेसच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी निर्भयपणे भाजपाच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलने केली. अनेक कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही कार्यकर्त्यांनी लढा सुरू ठेवला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. शहर काँग्रेसतर्फे केल्या जात असलेल्या आंदोलनांची राहुल गांधी यांनी प्रशंसा केली व संघटन मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाय योजण्याची सूचना केली.गहलोत यांनाही सोपविला अहवाल ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने अशोक गहलोत यांची भेट घेतली. त्यांनाही शहर काँग्रेसच्या कामाचा अहवाल सोपविण्यात आला. यावेळी विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी, प्रशांत धवड, नगरसेवक संदीप सहारे, संजय महाकाळकर, हरीश ग्वालवंशी, नितीश ग्वालवंशी, दीपक वानखेडे, योगेश तिवारी, मनोज सांगोळे, विवेक निकोसे, प्रवीण गवरे, सूरज आवळे, राज खत्री, आसिफ शेख, हर्शल पाल, प्रशांत उके, प्रवीण सांदेकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVikas Thakreविकास ठाकरे