शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘रील लाईफ’मधील गडकरी कोण ? सस्पेन्स झाला दूर; राहुल चोपडा मुख्य भूमिकेत

By योगेश पांडे | Updated: October 13, 2023 16:41 IST

या चित्रपटातून गडकरींचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री हा राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे.

नागपूर : देशातील महामार्गांना दिशा देणाऱ्या व भारताचे हायवेमॅन म्हणूनही ओळख असणाऱ्या केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर चित्रपट येत आहे. या चित्रपटात गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यावरील पडदा हटला असून राहुल चोपडा हा अभिनेता गडकरी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

आपल्या कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपाच्या नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन गडकरींवर येणाऱ्या चित्रपटाचं नाव 'गडकरी' असे आहे. या चित्रपटातून गडकरींचा कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री हा राजकीय प्रवास मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. गडकरी यांचा संघर्ष, जनसंघापासून भाजपपर्यंतचा त्यांचा प्रवास, संघ स्वयंसेवक म्हणून त्यांचे योगदान, राजकीय प्रवासातील प्रमुख टप्पे इत्यादींवर यात प्रकाश टाकण्यात येणार आहे. बॅकड्रॉपमध्ये महामार्ग, रस्ते आणि पाठमोरे नितीन गडकरी असे या चित्रपटाचे पोस्टर आहे.

हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. मागील आठवड्यात त्याचे पोस्टर रिलीज झाले होते. या चित्रपटात गडकरी यांच्या पत्नी कांचन यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. अनुराग भुसारी यांनी गडकरींच्या या बायोपिकचं दिग्दर्शन केले आहे. तर अक्षय देशमुख यांनी निर्मिती केली आहे. याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर चित्रपट येऊन गेले आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी