शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील लक्ष्मीनगरात दारूच्या नशेत कारचालकाचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:59 IST

दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने रस्त्यावर हैदोस घातला. या कार चालकाने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. अखेर दुभाजकाला धडकून कारही क्षतिग्रस्त झाली. ही घटना आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदुचाकी वाहनांना धडक, दोन गंभीर जखमी: दुभाजकाला धडकून कारचा चुराडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने रस्त्यावर हैदोस घातला. या कार चालकाने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. अखेर दुभाजकाला धडकून कारही क्षतिग्रस्त झाली. ही घटना आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास घडली.प्रत्यक्षदर्शीनुसार रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास आठ रस्ता चौकाकडून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कार चालकाने लक्ष्मीनगर चौकात दोन दुचाकी वाहनांना मागून धडक दिली. रस्त्यावरील नागरिकांनी कारला रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु कार चालक भरधाव वेगाने कार घेऊन पळू लागला. यात कार चालकाने समोर जाऊन हॉटेल अशोक समोर आणखी दोन वाहनांना धडक दिली. यानंतर दुभाजकाला कार धडकली. यात कारचेही प्रचंड नुकसान झाले. कार चालकही जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, चालक नशेत असल्याचे आढळून आले. अपघाताची माहिती होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमुळे जखमी झालेल्या इतर चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पोलिसांनी पुढे काय कारवाई केली, हे माहिती होऊ शकले नाही.

 

टॅग्स :carकारDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह