शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील चिंधी बाजार व्यावसायिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 11:55 IST

शहरातील शेकडो विक्रेते मागील ५० वर्षांपासून घरोघरी जाऊन किंवा शनिवार बाजार, रेल्वे स्टेशन परिसर किंवा अन्य आठवडी बाजारात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांड्यांचा व्यवसाय करतात. मात्र लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून या विक्रेत्यांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्दे व्यवसायासाठी परवानगी देण्याची मागणीउपमहापौरांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमध्ये शहरातील बाजार बंद असल्याने जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडे विक्री करणाऱ्या शेकडो चिंधी बाजार व्यावसायिक संकटात सापडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करता शहरातील बाजार सुरू करावा अथवा त्यांच्या उपजीविकेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी शिष्टमंडळाने उपमहापौर मनीषा कोठे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

याप्रसंगी उपायुक्त निर्भय जैन यांच्यासह शिष्टमंडळातील उपसभापती नागेश सहारे, ज्ञानेश्वर तायवाडे, धृपती खरे, गीता सनेसर, आशा तायवाडे, वैशाली खंडारे, लता कावळे, रत्ना इंगळे आदी उपस्थित होते.शहरातील शेकडो विक्रेते मागील ५० वर्षांपासून घरोघरी जाऊन किंवा शनिवार बाजार, रेल्वे स्टेशन परिसर किंवा अन्य आठवडी बाजारात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांड्यांचा व्यवसाय करतात. मात्र लॉकडाऊनमुळे मागील तीन महिन्यापासून या विक्रेत्यांचे हाल होत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला स्थानिक आमदार, नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींमार्फत मदत करण्यात आली. मात्र आता पुढील काळ उपासमारीचा आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात मातंग समाजबांधव असून यंदा बॅण्ड पार्टी आणि रिक्षाचाही व्यवसाय हिरावला गेला आहे. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन आठवडी बाजारात व्यवसायासाठी परवानगी द्यावी किंवा उपजीविकेसाठी अन्य व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात व्यावसायिकांना तातडीने जागा उपलब्ध करण्याचे निर्देश मनीषा कोठे यांनी दिले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस