शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथी विशेष; शांतिनिकेतन शैलीत होणार वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:43 IST

बंगालमध्ये ‘बाईशे श्राबोण’ अर्थात श्रावणातील २२ तारीख म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याने साजरी केली जाते.

ठळक मुद्देबाईशे श्राबोण मराठी महिलेच्या इच्छेला बंगाली बांधवांनी दिली साथ

प्रवीण खापरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बंगालमध्ये ‘बाईशे श्राबोण’ अर्थात श्रावणातील २२ तारीख म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याने साजरी केली जाते. निसर्गाशी गुरुदेवांचे असलेले भावनिक आणि शास्त्रीय अनुबंधाची स्मृती म्हणून शांतिनिकेतनमध्ये या दिनानिमित्त आगळ्यावेगळ्या शैलीत वृक्षारोपण केले जाते. अगदी त्याच शैलीत प्रथमच नागपुरात वृक्षारोपणाचा सोहळा म्हणजेच गुरुदेवांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे.कथा, कादंबरी, कविता, नाटक, संगीत, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्प अशा नानाविध साहित्य-कलेचे आयाम घेऊन जगताला भुरळ घालणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथमच बंगालमधील शांतिनिकेतन आणि महाराष्ट्रातील नागपूरचे धागे आणखी घट्ट बांधले जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी नागपुरात राहणाºया बंगाली नव्हे तर एका मराठी महिलेची प्रगाढ इच्छा कारणीभूत ठरली आणि बंगाली बांधवांनी, ती इच्छा उचलून धरत हा सोहळा आयोजित करण्याचा प्रण घेतला. त्या अनुषंगाने नागपूरकरांना वृक्षारोपणाचा हा अद्भूत सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता येणार आहे. रवींद्र संगीताच्या सुरेल स्वरांच्या प्रख्यात गायिका अरुंधती वझलवार-देशमुख यांच्या इच्छेला बंगाली बांधवांनी साथ दिली आहे. इंग्रजी तारखेनुसार ७ ऑगस्ट ही गुरुदेवांची पुण्यतिथी असते. मात्र, बंगाली तिथीनुसार श्रावणातला २२ वा दिवस हा पुण्यतिथीचा दिवस असतो. या तिथीला शांतिनिकेतनतर्फे ‘बाईशे श्राबोण’ असे नामकरण करण्यात आले. यंदा ही तिथी ८ ऑगस्टला येत आहे. त्या अनुषंगाने रविवारचा दिवस बघता बंगाली समाजातर्फे ११ ऑगस्टला दुपारी ४ वाजता सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबच्या लॉनमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

इच्छेला मूर्तरूप येतेय, हीच गुरुदेवांना श्रद्धांजली - अरुंधती देशमुखमाझे वडील प्रा. विद्यासागर वझलवार हे शांतिनिकेतनमध्ये संगीताचे प्राध्यापक असल्याने, मी बालपणापासून ते वयाच्या २३ व्या वर्षीपर्यंत तेथेच होते आणि रवींद्र संगीताचे धडे गिरवीत होते. वैवाहिक कारणाने नागपुरात आल्यानंतर संसारात रमले. काही वर्षांनंतर त्यांनी गुरुदेवांच्या जयंतीला रवींद्र गायनाचे कार्यक्रम सुरू केले. मात्र, शांतिनिकेतनमध्ये ज्याप्रकारे पुण्यतिथी साजरी केली जाते, तशीच नागपुरात आयोजित करण्याची इच्छा होती, असे अरुंधती देशमुख यांनी सांगितले.

पंचमहाभूतांच्या साक्षीने होणार वृक्षारोपण१९२८ मध्ये श्रावणातल्या पहिल्या दिवशी वृक्षारोपणाचा सोहळा साजरा करण्यास टागोर यांनी सुरुवात केली. १९४१ मध्ये श्रावणातल्या २२ व्या दिवशी अर्थात ७ ऑगस्ट रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पुढच्या वर्षापासून शांतिनिकेतनने गुरुदेवांच्या स्मृतीला अनुसरून श्रावणातल्या पहिल्या दिवसाचा वृक्षारोपणाचा सोहळा २२ व्या दिवशी अर्थात ‘बाईशे श्रावण’ला करण्याचा निर्धार केला. साधारणत: ही तिथी दरवर्षी मागे-पुढे ७, ८ किंवा ९ ऑगस्ट रोजी येत असते. विशेष म्हणजे, वृक्षारोपणाचा हा सोहळा पंचमहाभूतांच्या प्रतिकात्मक रूपांच्या साक्षीने साजरा केला जातो. रवींद्र संगीताची धून, गायन अन् नृत्याच्या तालात ‘बालतरु (रोपटे)’ घेऊन पालखी काढली जाते. अन् पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाशाच्या रूपात सजवलेल्या पाच मुलांच्या साक्षीने वृक्षारोपणाचा सोहळा पार पडतो. अगदी असाच सोहळा नागपुरात साजरा होणार आहे.

टॅग्स :Ravindranath Tagoreरवींद्रनाथ टागोर