शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड अभियानावर प्रश्नचिन्ह : लावलेली अर्धीच झाडे जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:15 IST

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर शहरात दरवर्षी झाडे लावली जातात. परंतु लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. प्राप्त अहवालानुसार, मागील तीन वर्षांत लावण्यात आलेल्या झाडांपैकी अर्धीच झाडे जिवंत आहेत. हा अहवाल खरा की खोटा याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने महापालिकेचा उद्यान विभाग हतबल झाला आहे. वृक्षारोपणातील नेमकी किती झाडे जगतात, याची प्रत्यक्ष आकडेवारी नसल्याने वृक्ष लागवड अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देनियंत्रणासाठी मनपाकडे यंत्रणाच नाही : मनुष्यबळ नसल्याने उद्यान विभाग हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर शहरात दरवर्षी झाडे लावली जातात. परंतु लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. प्राप्त अहवालानुसार, मागील तीन वर्षांत लावण्यात आलेल्या झाडांपैकी अर्धीच झाडे जिवंत आहेत. हा अहवाल खरा की खोटा याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मनुष्यबळ नसल्याने महापालिकेचा उद्यान विभाग हतबल झाला आहे. वृक्षारोपणातील नेमकी किती झाडे जगतात, याची प्रत्यक्ष आकडेवारी नसल्याने वृक्ष लागवड अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मागील तीन वर्षांत १ लाख ८ हजार ९६८ झाडे लावण्यात आली. यातील ६३ हजार ३४८ झाडे जिवंत असल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. लावलेली झाडे जिवंत आहेत की नाही, याची शहानिशा करण्यासाठी तपासणी होण्याची गरज आहे. याची जबाबदारी उद्यान विभागावर आहे. महाराष्ट्र शहरी वृक्षारोपण कायदा १९७५ नुसार उद्यान विभागात सहायक आयुक्तपदाच्या दर्जाचा अधिकारी, वृक्ष अधिकारी व इतर कर्मचारी व अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र उद्यान विभागात मंजूर २७३ पदांपैकी १५७ पदे रिक्त आहेत. यामुळे विभागात कामकाजासाठी कर्मचारी व अधिकारी नाही. अशा परिस्थितीत झाडांचे सर्वेक्षण शक्य नाही.संगोपन कोण करणार?दरवर्षीप्रमाणे पावसाला सुरुवात झाल्यानंतर तीन महिन्यात शहरात ८२ हजार ५०० झाडे लावली जाणार आहेत. वृक्ष लागवड अभियानाचा पदाधिकारी व अधिकारी गाजावाजा करीत आहेत. मात्र लावलेली झाडे जिवंत ठेवण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभियान राबविताना विविध सेवाभावी संस्था, शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था व नागरिक सहभागी होतात. परंतु अभियान संपल्यानंतर झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी निश्चित केलेली नाही.५० हजार झाडे लागलीच नाहीबांधकाम व अन्य कारणासाठी झाडे तोडण्याची उद्यान विभागाकडे परवानगी घ्यावी लागते. एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावून ती जगविण्याची जबाबदारी संबंधितांची असते. यासाठी प्रत्येक झाडासाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते. जाडे जगली तर ही रक्कम परत केली जाते. मागील पाच वर्षात दहा हजार झाडे तोडण्याची परवानी देण्यात आली. त्यानुसार ५० हजार नवीन झाडे शहरात लागणे अपेक्षित होते. परंतु नवीन झाडे लावण्यात आलेली नाही.झोन स्तरावर सक्षम यंत्रणा हवीवृक्ष लागवड अभियानात लावलेली व बांधकामासठी परवानगी घेताना अपेक्षित झाडे लावून ती जगावी. यासाठी महापालिकेच्या झोन स्तरावर सक्षम यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन व्यवस्थित होते की नाही. याची तपासणी करण्यासाठी उद्यान विभागाचे स्वतंत्र पथक निर्माण करण्याची गरज आहे तरच लावलेली झाडे जगतील.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentवातावरण