शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर वन विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 10:56 IST

प्रादेशिक नागपूर वन विभागांतर्गत जंगलामध्ये अवैध वृक्षतोडीच्या दोन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ठळक मुद्देखाप्यात २.५ लाखाच्या वृक्षतोडीवर आरएफओसह चार निलंबित कळमेश्वरमध्ये आठ लाख सागवान प्रकरणात केवळ कारणे दाखवा

योगेंद्र शंभरकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक नागपूर वन विभागांतर्गत जंगलामध्ये अवैध वृक्षतोडीच्या दोन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेल्या वर्षी ४ मार्च रोजी प्रादेशिक खापा वन परिक्षेत्रात २ लाख ५७ हजार रुपयांची आडजात वृक्षांची कटाई करण्यात आली होती. या प्रकरणात तीन महिन्यानंतर आरएफओ, फॉरेस्टर, वनरक्षकसह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. दुसरीकडे कळमेश्वर वनक्षेत्रात झालेल्या आठ लाख रुपयांच्या सागवान कटाईत चार महिन्यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. सूत्रांच्या महितीनुसार, कळमेश्वरच्या वृक्षतोडी प्रकरणात वन विभागाच्या व्हिजिलन्स टीमच्या चौकशीत हिंगण्याचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी दोषी आढळले होते. परंतु या कर्मचाऱ्यांना केवळ कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, खापा वनपरिक्षेत्रात जटामखोरा, मौजा कवठा येथे ७ सप्टेंबर २०१७ ला ६७६ आडजात वृक्षाची अवैध कटाई करण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले होते. फॉरेस्ट मोबाईल स्क्वॉडने केलेल्या चौकशीत ३० घनमीटर लाकडांची कटाई झाल्याचा अहवाल दिला होता. यात २ लाख ५७ हजार ५८८ रुपयांचे नुकसान झाले होते. या अहवालावरून अवघ्या तीन महिन्यात खापा येथील तत्कालीन आरएफओ एस.व्ही. तागडेसह चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. परंतु कळमेश्वरच्या आरक्षित जंगलात हिंगण्याचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या अनुमतीवर सागवानच्या ४०० वृक्षाची कटाई करण्यात आली होती. या प्रकरणात केवळ कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. अशाप्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या दुटप्पी कारवाईची चर्चा विभागात आहे.

हिंगण्यात मंजुरी, कळमेश्वरमध्ये वृक्षकटाईगेल्या वर्षी क ळमेश्वर, पांजरा गावात सातनवरी बीटला लागून शेती करणारे बळीराम भोयर यांनी आपल्या शेतातील ४०० सागवानचे वृक्ष कापण्याची परवानगी मागितली होती. तत्कालीन हिंगणा आरएफओने खसऱ्याची प्रत्यक्ष पाहणी न करता कटाईची अनुमती दिली. खसरा क्रमांक ७७ हा सातनवरी कळमेश्वर रेंजमध्ये आरक्षित जंगलाचा हिस्सा आहे. येथे सागवानाची वृक्षतोड होत असताना कळमेश्वरचे अधिकारी व वनकर्मचाऱ्यांचे लक्ष गेले नसेल का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग