शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हिवाळी अधिवेशनासाठी जारी निविदांमधे साध्यासाध्या वस्तूंना लावले चौपट दर; तयारीच्या कामाला बसला झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 21:07 IST

Nagpur News ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन तयारीच्या सुरुवातीलाच झटका बसला.

नागपूर : ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन तयारीच्या सुरुवातीलाच झटका बसला. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)ने तयारीसाठी आवश्यक विविध वस्तूंसाठी जारी केलेल्या बहुतांश निविदा रद्द केल्या आहेत. अनेक वस्तूंचे दर हे अधिक दर्शविल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी नुकतेच नागपुरात येऊन आढावा घेतला. त्यानंतर तयारीच्या कामाला गती मिळाली होती. काही मंत्री नागपुरात अधिवेशन घेण्याच्या विरोधात असल्याचेही वृत्त आहेत. यातच आता पीडब्ल्यूडीने ५० कोटीच्या तब्बल १०० पेक्षा अधिक निविदा रद्द केल्या आहेत. यात देखभाल दुरुस्तीपासून तर विविध वस्तू उपलब्ध करण्याच्या निविदांचा समावेश आहे.

कंत्राटदारांनी अगोदर हो-नाही करत अखेर काम करण्यास तयारी दर्शविली. परंतु असेही सांगण्यात येत आहे की, त्यांना मिळालेल्या आश्वासनानुसार दिवाळीपूर्वी २०१९ मधील कामांचे थकीत ५० कोटी रुपये मिळाले नाही तर ते काम थांबवतील. विशेष म्हणजे विदभार्तील सर्व कंत्राटदारांचे मिळून या महिन्यात जवळपास सरकारकडे ५०० कोटींची थकबाकी आहे. याविरोधात कंत्राटदारांनी आंदोलनही केले आहे.या दरम्यान पीडब्ल्यूडीने नवीन कामांच्या निविदा जारी केल्या. कोविड संक्रमणामुळे पहिल्यांदा सॅनिटायझर, मास्क खरेदीचे टेंडरही जारी झाले. यात गडबड अशी झाली की ५ रुपयाला मिळणारे मास्कचे दर २५ रुपये निश्चित करण्यात आले. सॅनिटायझरसुद्धा एका लिटरसाठी ६०० रुपयापेक्षा अधिक दर दर्शविण्यात आले. हे दर बाजारभावापेक्षा दुप्पट आहेत. पाण्याचा पुरवठ्यासाठी चार पटीने अधिक दर निश्चित करण्यात आले. निविदा जारी झाल्यास मोठे वादळ उठले असते. त्यामुळे पीडब्ल्यूडीने तातडीने सर्व टेंडर रद्द केले.असे होते दरवस्तू                          - दर                          - बाजारभावसॅनिटायझर -           ८ हजार रुपये -              ३ हजार रुपये२० लिटर पाणी कॅन  - ९५ रुपये -                 २० ते ३० रुपयेमास्क             -           २५ रुपये -                  ५ रुपयेआमदार निवास -    १६,३५,०२१ रुपयेइतर इमारती -            ४,९६,१७८आता दिवाळीनंतरच हालचालीपीडब्ल्यूडीचे म्हणणे आहे की, पुढच्या सोमवारी नवीन दरांसाठी निविदा जारी करण्याची तयारी होत आहे. परंतु या निर्णयामुळे कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे. उर्वरित निविदाही रद्द होऊ शकतात, या भीतीने त्यांनी सर्व कामे थांबवली आहेत. आता दिवाळीनंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. कामांबाबत हालचाली दिसून येतील.

पारदर्शकतेसाठी घेतला निर्णयनिविदा प्रक्रिया पारदर्शी ठेवण्यासाठी विविध वस्तूंच्या खरेदीचे टेंडर रद्द करण्यात आले आहे. काही वस्तूंचे दर हे त्यावेळचे आहेत जेव्हा कोविड संक्रमण शीर्षस्थानी होेते. आता हे दर खूप कमी झाले आहेत. त्यामुळे डेप्युटी इंजिनियरला आजच्या दरानुसार निविदा जारी करण्यास सांगितले आहे. कमीत कमी खर्चात हिवाळी अधिवेशनाची तयारी करण्याचा संकल्पसुद्धा केला आहे. विभाग या दिशेने कार्य करीत आहे.जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता,सार्वजनिक निर्माण विभाग

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन