शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

शिक्षकांना मतदानासाठी जांभळ्या रंगाचा पेन

By admin | Updated: January 24, 2017 02:54 IST

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ६ फेब्रुवारीला

विभागीय आयुक्त : इतर पेनचा वापर केल्यास मतदान अवैध नागपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारीला मतदान होणार असून, ६ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या वेळी मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. तसेच मतदारांना मतदानासाठी प्रशासनाकडून जांभळ्या रंगाचा शाईचा विशेष पेन पुरविण्यात येणार आहे. मतदान नोंदणीसाठी या विशेष पेनाचा उपयोग करायचा आहे. इतर पेनचा उपयोग केल्यास मतदान अवैध ठरणार आहे, अशी माहिती शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. अनुप कुमार यांनी सांगितले, नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे. मतदानासाठी १२४ केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यासाठी ६८० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार म्हणून ३४ हजार ९८७ शिक्षकांची नोंदणी झाली आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून पुरविण्यात येणारा विशेष पेन त्यांच्याकडून परत घेण्याकरिता एका मतदान अधिकाऱ्याची नेमणूक सुद्धा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहितेदरम्यान विकास कामे, महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी दिली. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष मोहोड, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपायुक्त पापडकर, तहसीलदार श्रीराम मुंधडा उपस्थित होते.(प्रतिनिधी) बावनकुळेंचे वक्तव्य आचारसंहितेचा भंग नाही विधान परिषदेचे आमदार फंड विकतात, असे विधान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच केले होते. त्यांचे हे वक्तव्य आचारसंहिता भंग नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी स्पष्ट केले. कुर्वे विराधातील तक्रार राजकीय जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे नागपूरचे स्थानिक आहेत. नागपूर महानगर पालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांची बदली करावी किंवा त्यांच्याकडे कोणताही कार्यभार देऊ नये, अशी तक्रार एका व्यक्तीकडून विभागीय आयुक्तांकडे केली आहे. यावर स्पष्टीकरण देताना विभागीय आयुक्त म्हणाले, ते सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आणि महापालिका निवडणुकीत मनपा आयुक्त हेनिर्णय अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या विरोधात केलेली तक्रार ही केवळ राजकीय असल्याचे अनुप कुमार म्हणाले. सेंट उर्सुला शाळेत होणार मतमोजणी मतमोजणी सेंट उर्सुला शाळेत होणार आहे. मतदानानंतर सर्व साहित्य या ठिकाणी सुरक्षा कक्षात जमा करण्यात येईल. याच ठिकाणी ६ फेब्रुवारीला मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल. व्ही.एम. पाटील निवडणूक निरीक्षक नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एमएडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व्ही.एम. पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विभागीय आयुक्त अनुप कुमार हे निवडणूक निर्णय अधिकारी राहतील. तर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे (नागपूर) हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहतील. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पार पडले आहे. आता दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षण होणार आहे. येत्या २८ जानेवारी रोजी मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होईल.