शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध असल्यामुळे शिक्षा कमी केली जाऊ शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 03:08 IST

हायकोर्टाचा निर्णय; निंदनीय गुन्ह्यामुळे दया नाही

राकेश घानोडे नागपूर : निंदनीय गुन्हा करणारे गुन्हेगार केवळ वयोवृद्ध आहेत, म्हणून शिक्षेत सूट दिली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका प्रकरणात दिला.

सुनेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे अकोला येथील सासू-सासरे कौसल्या खेर्डेकर (७३) व श्यामराव खेर्डेकर (७८) हे वृद्ध आहेत. त्यामुळे त्यांची शिक्षा कमी करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. न्यायालयाने ती विनंती फेटाळली. ते दोघे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असल्याच्या कारणास्तव त्यांची शिक्षा कमी केली जाऊ शकत नाही. त्यांनी नवविवाहितेचा मानसिक छळ करण्याचे निंदनीय कृत्य केले आहे. असह्य छळामुळे नवविवाहितेला आत्महत्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे दोघांवर दया दाखवता येणार नाही असे न्यायालयाने नमूद केले.

सुनेचा शारीरिक छळ केला नाही असा दावाही न्यायालयात करण्यात आला होता. न्यायालयाने तो दावा खोडून काढला. आत्महत्येचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक वेळी शारीरिक छळच आवश्यक नसतो. मानसिक छळ हा शारीरिक छळापेक्षा अधिक त्रासदायक असतो. त्यातूनसुद्धा व्यक्ती जीवन संपविण्याचा निर्णय घेऊ शकते.

या प्रकरणातील मयत मुलगी सासरी गेली, तेव्हा तिचा पती मानसिक आजारी असल्याचे कळले. या धक्क्यातून सावरत असतानाच तिच्यावर गर्भधारणेसाठी सासऱ्याशी शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यासाठी तिचा मानसिक छळ केला, मारहाण केली. उपाशी ठेवण्यात आले. हे कृत्य आत्महत्या करण्यासाठी कारणीभूत ठरणारे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.सत्र न्यायालयाने ९ नोव्हेंबर २००६ रोजी दोघांना पाच वर्षे सश्रम कारावास व १०० रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. ते अपील फेटाळण्यात आले. मयत महिलेचे १२ मे २००५ रोजी रामेश्वर याच्याशी लग्न लावण्यात आले. मात्र तिने ६ आॅक्टोबर २००५ रोजी आत्महत्या केली.

टॅग्स :Courtन्यायालय