शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुलगाव दारूगोळा स्फोटातील आरोपीला जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:52 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी कामगार पुरवठा कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. तसेच, आरोपीचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : २० नोव्हेंबरची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी कामगार पुरवठा कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. तसेच, आरोपीचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.आॅर्डनन्स फॅक्टरी खामरिया, जबलपूर (मध्य प्रदेश) येथील दोषपूर्ण व मुदतबाह्य दारूगोळा नष्ट करण्यासाठी पुलगाव, जि. वर्धा येथील केंद्रीय दारूगोळा भांडारमध्ये आणण्यात आला होता. १९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत हे काम केले जाणार होते. हे जोखमीचे व अतिसंवेदनशील काम असते. त्यामुळे तज्ज्ञ चमूच्या निरीक्षणाखाली हे काम केले जाते. परंतु, खड्डे खोदणे, दारूगोळा ट्रकमधून खाली उतरवणे, तज्ज्ञ सांगतील त्या ठिकाणी दारूगोळा पोहोचविणे इत्यादी कामांसाठी कामगारांची आऊटसोर्सिंग केली जाते. अशा कामगारांची आऊटसोर्सिंग आरोपी चांडककडून करण्यात आली होती. तो अधिकृत कामगार पुरवठा कंत्राटदार आहे. २० नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ट्रकमधून दोषपूर्ण दारूगोळा खाली उतरविताना एका बॉक्सचा जोरदार स्फोट झाला. त्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला तर, १८ जण गंभीर जखमी झाले. हे धोकादायक काम असताना त्यासाठी अकुशल व अप्रशिक्षित कामगार पुरविल्यामुळे चांडकविरुद्ध देवळी पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी सदोष मनुष्यवध व सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे दोन गुन्हे नोंदविले. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी चांडकने सुरुवातीला वर्धा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज २८ नोव्हेंबर रोजी खारीज झाला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चांडकतर्फे वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता तर, सरकारतर्फे अ‍ॅड. हर्षवर्धन धुमाळे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयWardha Blastवर्धा स्फोट