शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जनतेने जबाबदारी दिल्यास स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:10 IST

आदित्य ठाकरे यांचे सूचक विधान; उपमुख्यमंत्रिपदाचा पेपर आताच फोडणार नाही

नागपूर : भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांत विधानसभा निवडणुकांसाठी युती होईलच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेपूर्वी पत्रपरिषदेत दिलेल्या शब्दांवर आम्ही कायम राहणार आहोत. सध्याच उपमुख्यमंत्रिपदाचा पेपर आताच फोडणार नाही, परंतु जनता जी जबाबदारी देईल ती स्वीकारेल, असे सूचक विधान शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

मंगळवारी आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा नागपुरात पोहोचली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युतीमधील जागावाटपाबद्दल मी बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात युतीबद्दल चर्चा झाली आहे. तेच याबद्दल बोलतील. मी निवडणूक लढवायची की नाही, कुठून लढवेल हे जनता ठरवेल. राज्यात सध्या विरोधकच नाहीत, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेच्या काही नेत्यांवर खंडणीखोरीचे आरोप लागत आहे. याबाबत विचारले असता आदित्य यांनी ठोस उत्तर दिले नाही. परंतु अशा नेत्यांवर कायद्यानुसार कारवाई व्हावी, असे ते म्हणाले.कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटीयावेळी आदित्य ठाकरे यांनी कर्जमाफीवरून राज्य सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले.कर्जमाफीमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यासाठी सरकारची मदत केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यकर्ते मदत करत आहेत.जेथे सरकारकडून समस्या सुटत नाही तेथे शिवसेना आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना