लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : रस्ते अपघात गंभीर बाब बनली आहे. त्याच्या नियंत्रणासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे तसेच सार्वजनिक साधनांचा पुरेपूर वापर व्हायला हावा, असे प्रतिपादन वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी हिंगणा मार्गावरील महामेट्राे स्टेशन परिसरात आयाेजित केलेल्या चर्चासत्रात केले. या चर्चासत्रात विविध संघटनांचे २३ प्रतिनिधी सहभागी झाले हाेते.
अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळाल्याचे त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी मदत यंत्रणा उभारणे आणि त्या यंत्रणेत नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे, असेही राजेंद्र पाठक यांनी सांगितले. यासाठी रस्ता सुरक्षा अभियान व अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्याचा मानस कैलास गिरी यांनी व्यक्त केला. यावेळी सुरेश काळबांडे, वाहतूक शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक विनाेद गिरी, रघुनाथ मालीकर, व्यापारी संघटनेचे रवींद्र जैन, वाहतूक आघाडीचे मानसिंग ठाकूर, डाॅ. शीतल उमरे, महामेट्राेचे ज्ञानदीप देवळे, महेश वासनिक, विदर्भ ज्येष्ठ नागरिक मंडळाचे बबन वानखेडे, एस. एस. पाटील, उमराव बाेबडे, शहाजी मेटे, सारंग गुडधे, वृत्तपत्र विक्रेता संघाचे प्रशांत काळने, दिगांबर खुसपरे, सुरेश ताेंडरे, डॉ. एस. खोब्रागडे, एमआयडीसीचे सचिन मेंडजाेगे यांनी मार्गदर्शन केले.
सर्वांनी रस्ते अपघात नियंत्रणासाठी वेगवेगळ्या उपाययाेजना सुचविल्या. शिवाय, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे व तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन केले. डिगडाेह ग्रामपंचायतच्यावतीने राजू वाघ यांनी आयाेजित केलेल्या या चर्चासत्राला अभय सेवारे, अनिल वाघ, नितीन तातेवार, रोडमार्कचे तालुका अध्यक्ष उमराव बोबडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित हाेते. नरेंद्र कुकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.