शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

सायको किलरचा उपराजधानीत थरार

By admin | Updated: February 5, 2017 02:39 IST

रस्त्याने जात असलेल्या महिला-मुलींवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या सायको किलरने उपराजधानीत थरार निर्माण केला आहे.

महिला-मुलींमध्ये प्रचंड दहशत : पोलीस प्रशासनाचीही उडाली झोप नागपूर : रस्त्याने जात असलेल्या महिला-मुलींवर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या सायको किलरने उपराजधानीत थरार निर्माण केला आहे. त्याच्या विकृतीचे किस्से फुगवून सांगितले जात असल्याने, सर्वसामान्य नागरिकांमध्ये विशेषत: महिला-मुलींमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यासंबंधाने निर्माण झालेला संताप बघता, हा नराधम चुकून जमावाच्या हाती लागला तर त्याचा अक्कू होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर, या वातावरणाची कल्पना आल्याने पोलीस प्रशासनाचीही झोप उडाली आहे. गेल्या महिनाभरापासून सायको किलरने उपराजधानीत हैदोस घालणे सुरू केले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याने एका युवतीवर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केले. सडकछाप मजनू किंवा एकतर्फी प्रेमातून द्वेष निर्माण झाल्यामुळे आरोपीने हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलीस अन् तक्रारकर्त्या युवतीने बांधला अन् गप्प बसले. तीन-चार दिवसानंतर अशाच प्रकारे पुन्हा एक घटना घडली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातही तशाच दोन घटना घडल्या. त्यानंतर पोलीस वर्तुळात सायको किलर चर्चेला आला. लोकमतने याबाबतचे (कोण हा रावण?) वृत्त सर्वप्रथम प्रकाशित केले. त्यानंतर सायको किलरला पकडण्यासाठी हालचाली वाढल्या. तो सापडला नाही. मात्र, त्याने आपली विकृती सुरूच ठेवली. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यातही त्याने दोन महिला,मुलींना चाकू मारून जबर जखमी केले. ३० जानेवारीच्या रात्री सायकोने कहरच केला. त्याने रेशीमबाग मैदानाजवळ चंद्रकला ढेंगे (वय ५०, रा. कर्नलबाग) यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. एका तासानंतर त्याने हनुमाननगर त्रिकोणी पार्कजवळ शोभा ठाकूर (वय ५०) या महिलेवर चाकूने वार केला. या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. त्याचे वृत्त प्रकाशित होताच सायको किलरची दहशत तीव्र झाली. शुक्रवारी ३ फेब्रुवारीला सक्करदऱ्यात त्याने पुन्हा एका तरुणीवर चाकूहल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची वार्ता शहरभर पसरली अन् दहशतीला रोषाची जोड मिळाली. (प्रतिनिधी) सायकोचा पेहराव आणि पद्धत सामान्य नागरिक आणि पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून हा नराधम विशेष खबरदारी घेतो. संबंधित सूत्रानुसार, सावज हेरण्यासाठी तो बहुदा काळपट मळकट रंगाचे पॅन्ट-शर्ट घालून त्यावर खांद्यापर्यंत स्कार्फ बांधतो. त्यावर हेल्मेट घालणारा हा सायको पल्सरसारखी मोटरसायकल वापरतो. त्याच्या मोटरसायकलच्या प्लेटवर दोनच नंबर दिसतात,असेही सांगितले जाते. तो सायंकाळी बाहेर पडतो आणि महिला-मुलींना हेरतो. साधारणत: एकटी असलेल्या महिला-मुलीला तो हेरतो. आजूबाजूला फारशी गर्दी नसेल आणि पळून जाण्यास सोपे होईल, अशा ठिकाणी हा नराधम महिला-मुलीवर चाकूचे घाव घालून पसार होतो. दक्षिणेतील दहशत तीव्र महिनाभरात आठ ते दहा महिला-मुलींना चाकूने भोसकून जबर जखमी करणारा सायको कोतवाली, हुडकेश्वर, अजनी आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरतो. हे सर्वच्या सर्व गुन्हे त्याने याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले आहेत. त्यामुळे तुलनेत या भागात त्याची दहशत जास्त आहे. सर्वाधिक ४ गुन्हे सक्करदऱ्यात, अजनी आणि हुडकेश्वरमध्ये प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला असून, अनेक गुन्हे नोंदलेच गेले नाही. तर, हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी ३०७ चा तर अन्य पाच गुन्ह्यात कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे सापळे, नागरिकांमध्ये रोष पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी जागोजागी सापळे लावले आहेत. मात्र हा नराधम अद्याप पोलिसांच्या सापळ्यात अडकला नाही. त्यामुळे तो अतिशय धूर्त असल्याचेही स्पष्ट होते. पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणा नसल्यानेही त्याची ओळख पटविण्यात अडसर निर्माण झाला आहे. दरम्यान, तो पकडला न गेल्यामुळे महिला-मुलींमधील दहशत वाढतच चालली असून, नागरिकांमध्येही रोष निर्माण झाला आहे. या रोषाचाच परिणाम म्हणून संतप्त महिला-पुरुषांनी शुक्रवारी रात्री सक्करदरा ठाण्याला घेराव घातला होता. सायको किलरच्या तातडीने मुसक्या बांधा, अशी संतप्त जमावाची मागणी होती. यामुळे परिसरात तणावही निर्माण झाला होता. पोलिसांचे आवाहन सायको किलरच्या संबंधाने रोज वेगवेगळ्या अफवा पसरत आहे. शुक्रवारी दुपारी आणि सायंकाळी अशाच प्रकारे त्याने सक्करद-यात दोन वेगवेगळळ्या तरुणींना भोसकल्याची अफवा पसरली होती. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास साईनगरात एका महिलेला भोसकल्याची आणि नंतर मानेवाड्यातील धनश्री लॉनजवळ दुस-या एका तरुणीवर चाकू हल्ला केल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली. काही उपद्रवी मंडळी सायको किलरच्या संबंधाने अफवा पसरवून दहशत वाढविण्यास मदत करीत आहे. सायको किलरच्या संबंधाने घराघरात चर्चा सुरू झाल्याने आणि रोज नवनवीन अफवा उडत असल्याने शहर पोलीसही अस्वस्थ झाले आहेत. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सोबतच सायको किलर बाबत कसलीही माहिती (तो कुठे राहतो हे माहीत असल्यास अथवा पुन्हा अशा प्रकारे गुन्हा करण्याचा त्याने प्रयत्न केल्यास किंवा गुन्हा करण्याच्या हालचाली करताना दिसल्यास) असल्यास पोलिसांना तातडीने कळविण्याचे आवाहनही शहर पोलिसांनी केले आहे.