शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मनोरुग्ण मुलीलाही तपासणे गरजेचे  : हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 22:58 IST

अत्याचार पीडित मुलगी मनोरुग्ण व दिव्यांग असली तरी, सत्र न्यायालयामध्ये आवश्यक प्रक्रियेचे पालन करून तिला तपासले गेले पाहिजे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी एका प्रकरणात दिला आहे.

ठळक मुद्दे नव्याने खटला चालविण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अत्याचार पीडित मुलगी मनोरुग्ण व दिव्यांग असली तरी, सत्र न्यायालयामध्ये आवश्यक प्रक्रियेचे पालन करून तिला तपासले गेले पाहिजे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी एका प्रकरणात दिला आहे.मनोरुग्ण व दिव्यांग मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या बबलू ऊर्फ मनोज अशोक बंदरकंठीवार (रा. गडचांदूर, जि. चंद्रपूर) याला सत्र न्यायालयाने १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपीलवरील सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने खटला चालविताना केलेल्या गंभीर चुकीकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. पीडित मुलीची अवस्था पाहता तिला तपासण्यात येऊ नये असा अर्ज सरकारी पक्षाने केला होता. सत्र न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला होता. त्यामुळे आरोपीचा स्वत:चा बचाव करण्याचा अधिकार बाधित झाला. पीडित मुलीची उलट तपासणी करण्याची संधी आरोपीला मिळाली नाही. पीडित मुलगी मनोरुग्ण व दिव्यांग असली तरी सत्र न्यायालयाने कायदेशीर प्रक्रियेचे पालन करायला हवे होते असे उच्च न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या त्रुटीमुळे उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून आरोपीविरुद्ध नव्याने खटला चालविण्याचा आदेश दिला आहे. खटला निकाली काढण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. तेव्हापर्यंत आरोपीला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपीतर्फे अ‍ॅड. मिर नगमान अली यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार