शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणला पोलिस संरक्षण पुरवा; हायकोर्टाचा सरकारला आदेश 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 5, 2024 19:04 IST

भाजीपाला, फळे, चॅट, पान, चहा आदी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे महामार्गांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

नागपूर: शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला आवश्यक त्यावेळी पोलिस संरक्षण पुरवा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला दिला. तसेच, महानगरपालिकेनेही त्यांच्या अधिकारक्षेत्रातील अतिक्रमण हटवावे, असे सांगितले.

भाजीपाला, फळे, चॅट, पान, चहा आदी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे महामार्गांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दरम्यान, बरेचदा प्राणघातक अपघातही होतात. परिणामी, अतिक्रमनावर नियमित कारवाई करीत राहणे आवश्यक आहे, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. महामार्गांसंदर्भातील समस्या दूर करण्यासाठी ॲड. अरुण पाटील यांची जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. फिरदौस मिर्झा तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे ॲड. अनीश कठाणे यांनी कामकाज पाहिले.

पारडी उड्डानपुलाचे काम येत्या मार्चपर्यंत संपेलआतापर्यंत पारडी उड्डानपुलाचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या मार्चपर्यंत संपेल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने उच्च न्यायालयाला दिली. यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. हा पुल कळमना ते एचबी टाऊन, इतवारी ते पारडी, एचबी टाऊन ते मानेवाडा रोड व प्रजापती चौक ते वैष्णोदेवी चौक असा बांधला जात आहे. पुलाची एकूण लांबी ८.०६ किलोमीटर आहे.

इंदोरा-दिघोरी पुल जून-२०२६ पर्यंतइंदोरा ते दिघोरीपर्यंत उड्डानपुल बांधण्यासाठी जून-२०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हा पुल ८.९ किलोमीटर लांब आहे. पहिल्या टप्प्यात कमाल चौक ते रेशीमबाग चौक तर, दुसऱ्या टप्प्यात भांडे प्लॉट चौक ते दिघोरी चौकापर्यंत पुल बांधला जाईल. पुलाचे कंत्राट एनसीसी कंपनीला देण्यात आले आहे, असेही महामार्ग प्राधिकरणने सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय