शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

विरोध नडला, मोर्चा अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 03:02 IST

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या मोर्चातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बुधवारी सकाळी केलेल्या लाठीहल्ल्यात १०० जण जखमी झाले.

१०० जखमींवर मेयोत उपचार : संगणक परिचालक मोर्चाला हिंसक वळण, मागण्यांवर ठामनागपूर : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या मोर्चातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बुधवारी सकाळी केलेल्या लाठीहल्ल्यात १०० जण जखमी झाले. या सर्वांवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचार करण्यात आले. यात १८ जखमींना विविध वॉर्डात भरती केले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भरती असलेल्या जखमींमध्ये चार युवतींचा समावेश आहे.राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने मंगळवारी विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चेकरांनी दुसऱ्या दिवशी, बुधवारी आपल्या मागण्या रेटून धरल्या. सकाळी अचानक मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात काही पोलिसांसह १०० कार्यकर्ते जखमी झाले. जखमींना तत्काळ मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. सकाळी ९ वाजता अपघात विभागात २० कार्यकर्त्यांना जखमी अवस्थेत आणण्यात आले. याची खबर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन खामगावकर यांना मिळताच ते डॉक्टरांच्या चमूसह विभागात पोहचले. त्यावेळी ड्युटीवर असलेले कॅज्युल्टी मेडिकल आॅफिसर (सीएमओ) डॉ. श्रुती कुकडे आणि डॉ. मंगेश भगत यांना विशेष सूचना देत रुग्णांवर उपचार सुरू केले. दुपारी १२.३० वाजेपर्यंत १०० जखमींवर उपचार करण्यात आले. यातील जखमी प्रकाश रणोत (३०) बुलडाणा, शिवाजी भुतेकर (२५) जालना, शितल पगारे (२४), जालना यांना अस्थिव्यंग विभागाच्या वॉर्डात, ईश्वर चव्हाण (२२) औरंगाबाद याला नेत्ररोग विभाागच्या वॉर्डात, जयश्री शेंडे (२५) भंडारा, संगीता लाडे (२४) नाशीक, चारुशीला पाटील (२५) नाशिक, हेमराज शेंडे (२५) भंडारा, अब्दूल रहिमखान (२०) औरंगाबाद, मनोहर राजूरकर (२९) चंद्रपूर, जाहनकरीम वामनराव (२६) बीड, मारुती चव्हाण (३५) नाशिक, विठ्ठल खरात (२७) बुलडाणा, जयदेव सरकार (२८) गोंदिया, दीपक वाघ (२९) जळगाव, मारुती सावंत (३०) जालना, गणेश घुले (२७) नाशिक व बाबासाहेब गायकवाड (३०) जालना यांच्यावर शल्यचिकित्सक विभागाच्या वॉर्डात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले. यातील मनोहर राजूरकर, विठ्ठल खरात, आणि बाबासाहेब गायकवाड हे गंभीर जखमी आहेत. तिन्ही रुग्णांना डोके आणि छातीवर लाठ्यांचा मार बसल्याने शरीराच्या आत जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळी दोन जखमींना सुटी देण्यात आली. लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा-धनंजय मुंडेसंगणक परिचालकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद विधान परिषदेत उमटले. परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला व लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. त्यांनी या मुद्यावर नियम २८९ अंतर्गत चर्चा करण्याची मागणी करणारा प्रस्ताव मांडला. परंतु सभापतींनी तो फेटाळून लावला. ‘संग्राम’ प्रकल्पामध्ये काम करणारे राज्यातील संगणक परिचालक आपल्या मागण्यांसाठी नागपूर अधिवेशनावर मोर्चा घेऊन आले असताना त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याऐवजी या परिचालकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी शासन पोलीसबळाचा वापर करून जनतेचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे. आंदोलनकर्त्यांवर अमानुष हल्ला करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात यावे, तसेच या संगणक परिचालकांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परिचालकांच्या शिष्टमंडळाचे मंगळवारीच समाधान केले असल्याची स्पष्टोक्ती केली. १४ व्या वित्त आयोगात ‘संग्राम’साठी तरतूद नसल्याने यापुढे याचे काय होईल हे आताच सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले. यावर अखेर सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी प्रस्ताव फेटाळल्याचा निर्णय सांगितला. तोपर्यंत हटणार नाहीहा राज्यभरातील २७ हजार संगणक परिचालकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे पोलिसांनी आमच्यावर कितीही लाठीचार्ज केला, तरी सरकार आम्हाला जोपर्यंत न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना बोलून दाखविला. ते म्हणाले, मंगळवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली. परंतु त्यातून काहीही फलित निघाले नाही. सरकार मागील एक वर्षांपासून केवळ आश्वासनेच देत आहे. त्यामुळे आम्ही मंगळवारी संपूर्ण रात्र रस्त्यावर काढली. सरकार जोपर्यंत ठोस निर्णय देत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही. असे ते म्हणाले. मोर्चेकऱ्यांचा जोश कायम पोलिसांच्या लाठीचार्चमध्ये शेकडो मोर्चेकरी जखमी झाले. यात कुणाचा हात मोडला तर कुणाच्या पायाला गंभीर जखम झाली. परंतु असे असताना अनेक मोर्चेकरी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर लगेच पुन्हा मोर्चात सहभागी झाले होेते. त्यांच्या हाता-पायावर बँडेज होते. शिवाय संघटनेचा अध्यक्ष सिद्घेश्वर मुंडे यांच्यासह अनेकांच्या शरीरावर पोलिसांच्या लाठ्यांचे वळ उमटले होते. मात्र असे असताना सर्व मोर्चेकऱ्यांमधील जोश कायम होता. सर्व मोर्चेकऱ्यांनी दिवसभर रस्त्यावर बसून पोलिसांच्या लाठीचार्चचा निषेध केला. रात्री उशिरापर्यंतसुद्धा सर्व मोर्चेकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.