शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कळमना येथे रस्त्यासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमेसह निदर्शने

By मंगेश व्यवहारे | Updated: October 3, 2023 21:17 IST

नागरिकांनी गांधी जयंतीला महात्मा गांधीजींची प्रतिमा घेऊन चिखलमय रस्त्यावर प्रतिकात्मक निदर्शने केली.

मंगेश व्यवहारे, नागपूर : उत्तर नागपुरातील कळमना परिसरातील नागराजनगर येथील कल्लन शाळेसमोरील कच्चा रस्त्यास दर पावसाळ्यात तलावाचे रूप प्राप्त होत असल्याने विद्यार्थ्यांना तसेच परिसरामधील रहिवाशांना चिखल आणि घाण पाण्यातून ये-जा करावी लागते. या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी गांधी जयंतीला महात्मा गांधीजींची प्रतिमा घेऊन चिखलमय रस्त्यावर प्रतिकात्मक निदर्शने केली.

शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुषांनी एकत्र येऊन प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.यावेळी शैलेंद्र वासनिक, शीला सपकाळे, छाया उईके, प्रशांत चावरे, सुहासिनी बागडे, वंदना जांभुळे, लता दाबेकर, राधिका मालाधरे, महिमा काशीकर, रेशम इनवाते, विभा सोनचित्ते, कमल चावरे, रेहाना नसीम सलमानी, रेशम काशीकर उपस्थित होते. कल्लन शाळेसमोरील पक्क्या रस्त्याच्या कामासाठी नागराज नगर विकास समिती व शहर विकास मंचच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांच्या सह्यांसह अनेक निवेदने महापालिकेला देण्यात आली आहेत. याची दखल घेत मनपाच्या स्लम विभागाने प्रस्तावही तयार केला आहे, परंतु आयुक्तांकडे तो प्रस्ताव मागील महिन्यांपासून प्रलंबित आहे. पक्का रस्ता नसल्याने या पावसाळ्यात विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

टॅग्स :nagpurनागपूर