शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाथर्डी हत्याकांडाचा सर्वत्र निषेध

By admin | Updated: October 28, 2014 00:24 IST

पाथर्डी येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यभरात निषेध सत्र सुरू आहे. नागपुरातही याचे पडसाद उमटले. सोमवारी विविध आंबेडकरी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन संविधान चौकात

आंबेडकरी संघटनांचे धरणे : आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागपूर : पाथर्डी येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यभरात निषेध सत्र सुरू आहे. नागपुरातही याचे पडसाद उमटले. सोमवारी विविध आंबेडकरी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन संविधान चौकात दिवसभर संयुक्तपणे धरणे आंदोलन करीत या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला, तसेच मुख्य आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. गेल्या २० आॅक्टोबर रोजी जि. अहमदनगर ता. पाथर्डी येथील जवखेडे या गावातील १९ वर्षांचा हुशार मुलगा सुनील जाधव, त्याचे वडील संजय जाधव व आई जयश्री जाधव यांची झोपेत अमानुषपणे हत्या करण्यात आली. जातीय मानसिकतेतून करण्यात आलेल्या या हत्याकांडामुळे आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संताप पसरला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. नागपुरातही संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. दिवसभर मूक धरणे देत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये पाथर्डी हत्याकांडातील मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि दलित हत्याकांडाच्या घटना रोखण्यासाठी दलितांना स्वतंत्र वसाहती निर्माण कराव्यात आदी मागण्यांचा समावेश होता. या धरणे आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल इंजिनीअर्स असोसिएशन (बानाई), आक्रमण युवक संघटना, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरम, समृद्ध महिला मंडळ, आंबेडकरराईट पार्टी आॅफ इंडिया, बुद्धिस्ट रिव्होल्युशनरी फ्रंट, आंबेडकरी प्रबोधन मंच, आवळेबाबू विचार मंच, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे समाज विकास संस्था, रिपब्लिकन मुव्हमेंट, बौद्ध समाज एकता परिषद, अण्णाभाऊ साठे समाज विकास संस्था, बहुजन भूमिहीन, किसान, कामगार कर्मचारी संघर्ष समिती, आंबेडकरी विद्यार्थी मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी युवा संघ, आॅल इंडिया बॅकवर्ड क्लासेस लॉयर्स अ‍ॅण्ड लॉ ग्रॅज्युएट असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, आंबेडकरी विचार मोर्चा, इंडियन जस्टीस पार्टी, पब्लिक पॉवर आॅफ इंडिया, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, निळाई, रिपाइं, बसपा, भारिप बहुजन महासंघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन फॉर जस्टीस अ‍ॅण्ड पीस, जि.प. कास्ट्राईब संघटना आदींसह आंबेडकरी विचारवंत, बुद्धिजीवी आणि विविध आंबेडकरी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. कास्ट्राईब महासंघाची निषेध सभा पाथर्डी हत्याकांडाच्या निषेधार्थ कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महासंघाच्या कार्यालयात निषेध सभा घेण्यात आली. महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या निषेध सभेत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. सभेत सोहन चवरे, सत्यदेव रामटेके, रूपराव उके, धर्मेश फुसाटे, बाळासाहेब बन्सोड, डॉ. राजेंद्र कांबळे, बबनराव ढाबरे आदी उपस्थित होते. आॅल इंडिया समता सैनिक दल आॅल इंडिया समता सैनिक दलातर्फे पाथर्डी हत्याकांडाचा निषेध व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे आरोपीला तातडीने अटक करावी, प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, जलदगती न्यायालयाद्वारे खटला चालविण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या याप्रसंगी ज्ञानेश्वर ढेपे, दादाराव अंबादे, राहुल सोमकुंवर, डॉ. संजय गजभिये, अवधूत मानवटकर, डी.बी. चंदनखेडे, आर.एस. जावळे, संजय दमके, सचिन कांबळे, पुरुषोत्तम भोंगाडे, तिलकचंद टेंभुर्णे, मधुकर पाटील आदी उपस्थित होते. उत्तर नागपूर युवक काँग्रेसपाथर्डी हत्याकांडाच्या निषेधार्थ उत्तर नागपूर युवक काँग्रेस एससी सेलतर्फे इंदोरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पवित्र वासनिक, माधुरी सोनटक्के, असद खान, आसिफ शेख, नीलेश खोब्रागडे, मंगेश सातपुते, सोनू राऊत, विलास खांडेकर, विजय डोंगरे, पंकज सावरकर, सतीश पाली, स्वप्नील मेश्राम, आकाश इंदूरकर, रोशनी रघुवंशी, तुषार भगत, मयुर गजभिये, स्वप्नील वाघमारे, धीरज रंगारी, हर्षल देशभ्रतार, सुदेश भैसारे आदी उपस्थित होते. भारतीय कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाच्या जाहीर निषेध करण्यात आला. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी कॉ. श्याम काळे, कॉ. अजय शाहू, रमेश जयसिंगपुरे, बाळ अलोणी, अनुप बोरकर, राजेश जांभुळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)