शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण; पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:44 IST

मुंबईसह राज्यातील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संबंधीच्या विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. त्यामुळे सर्वांसाठी घरे या संकल्पाची अंमलबजावणी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराज्यभरातील झोपड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा

आॅनलाईन लोकमतनागपूर - मुंबईसह राज्यातील २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देत त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. या संबंधीच्या विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली. त्यामुळे सर्वांसाठी घरे या संकल्पाची अंमलबजावणी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.आतापर्यंत १ जानेवारी २००० पर्यंतच्याच झोपड्या अधिकृत मानल्या जात होत्या. पंतप्रधान आवास योजनेत २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याची योजना आहे. मात्र, केवळ २००० पर्यंतच्याच झोपड्यांना संरक्षण असल्याने पुनर्विकासासाठी केवळ ३० टक्केच झोपड्या पात्र ठरत होत्या. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या अनेक योजना रखडल्या होत्या. आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्यासंबंधीचे महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास विधेयक गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज सभागृहात मांडले. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, २०११ मध्ये जनगणना झाली होती. त्यावर्षीची संबंधित सर्व आकडेवारी अधिकृतपणे उपलब्ध असल्याने त्या वर्षापर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. झोपडीधारकास आहे त्याच ठिकाणी किंवा तसे शक्य नसेल तर जवळच्या जागेवर पुनर्विकास योजनेत घर मिळेल. बांधकाम होईपर्यंत त्यांच्या निवासाची व्यवस्था संक्रमण शिबिरात केली जाईल व ते शक्य नसेल तर भाडे/नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. संक्रमण शिबिरातील गाळ्याचे क्षेत्रफळ किमान १२० चौरस फूट असेल.- २०११ पर्यंतच्या ज्या झोपड्यांचा पुनर्विकास केला जाईल त्यातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेतील आर्थिक लाभ दिला जाईल. त्यापेक्षा अधिकचे बांधकाम मूल्य (कन्स्ट्रक्शन कॉस्ट) हे झोपडीधारकांस भरावे लागेल.- २०११ पर्यंतच्या कोणत्या झोपड्या आहेत हे प्रमाणित करण्याचे अधिकार मुंबईत एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असतील. त्यांनी मान्यता दिलेल्या झोपडपट्टयांचाच पुनर्विकास केला जाईल. त्यामुळे कामे गतीने होतील आणि खाबुगिरीला आळा बसेल.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस