शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

२०० महिलांना मिळाले हिंसाचारापासून संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:50 IST

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने २००५ साली स्वतंत्र अधिनियम काढले असून या अधिनियमाचा आधार घेत कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या ....

ठळक मुद्दे३४ प्रकरणे निकाली : महिला व बाल विकास विभागाची मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने २००५ साली स्वतंत्र अधिनियम काढले असून या अधिनियमाचा आधार घेत कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या २०० महिलांना संरक्षण प्राप्त झाले आहे.सामाजिक बदलांचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर पडत चालला आहे. दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांची मोठ्या प्रमाणात परवड होते. त्यांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागते. कधीकधी या जाचाला कंटाळून पीडित महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. या सर्व प्रकारांवर आळा घालण्यासाठी शासनाने २००५ साली कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम काढले आहे.या अंतर्गत स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर जिल्हा संरक्षण अधिकारी व तालुकास्तरावर तालुका संरक्षण अधिकारी नेमण्यात आले आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिला तालुकास्तरावरील संरक्षण अधिकाºयाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित महिलेला न्यायालयीन लढाईसाठी सर्वोतोपरी मदत केली जाते.महिलेच्या तक्रारीनुसार विधी सल्लागाराच्या मार्गदर्शनात न्यायालयात केस उभी केली जाते. संबंधित महिलेच्या न्यायालयीन खर्चाची संपूर्ण जबाबदारी महिला व बाल विकास विभागाच्या मार्फत उचलली जाते.२००५ ते २०१७ या कालावधीत सुमारे २०० महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरल्या. त्यांनी महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला व बाल विकास विभागाने उचलली. त्यापैकी ३४ प्रकरणांचा न्यायालयाचा निकाल लागला असून १६६ प्रकरणे प्रलंबित आहेत.कायद्याबाबत महिलांमध्ये जनजागृतीचा अभावकौटुंबिक हिंसाचाराचा बळी ठरलेल्या संपूर्ण महिलांच्या संरक्षणाची व त्यांना न्याय हक्क मिळवून देण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभाग उचलतो. महिलांना तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी तालुकास्तरावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात अभय केंद्र स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये संरक्षण अधिकाºयाची नेमणूक केली आहे. मात्र याबाबतची फारशी जनजागृती झाली नसल्याने पीडित महिला अभय केंद्रात जाण्याऐवजी पोलीस स्टेशनमध्येच जात असल्याचे दिसून येते. यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्याची गरज आहे.