शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:45 IST

संविधान धर्मवाद्यांच्या हातात गेले तर देश संकटात येईल. म्हणून राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा, असे मर्मभेदी आवाहन स्वातंत्र्य संग्राम सैनिक व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे यांनी केले.

ठळक मुद्देलीलाताई चितळे यांचे आवाहनअ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्व भारतीय लोक जातीभेद विसरून सामील झाले होते. पण स्वातंत्र्यानंतर मिळालेले एकही आश्वासन, स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. जातीव्यवस्था नष्ट करण्यात आम्ही अपयशी ठरलो. आजतर धर्माच्या नावाखाली देशाचा सर्वोच्च धर्मग्रंथ असलेली राज्यघटनाच छिन्नविछिन्न करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संविधान धर्मवाद्यांच्या हातात गेले तर देश संकटात येईल. म्हणून राज्यघटना कैद होण्यापासून वाचवा, असे मर्मभेदी आवाहन स्वातंत्र्य संग्राम सैनिक व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत लीलाताई चितळे यांनी केले.अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाच्या समारोपीय समारंभात विचारपीठावरून लीलाताई बोलत होत्या. याप्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक उर्मिला पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विमल थोरात, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई साखरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. लीलाताई यांनी अत्यंत भावनिक स्वरात स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक घडामोडींचा उल्लेख केला. माझे वय ९० वर्षाचे होत आहे. मी वर गेल्यावर आंबेडकर आणि गांधी मला भेटले आणि त्यांनी ‘तुम्ही काय केले’, असे विचारले तर माझी मान शरमेने खाली जाईल, अशी खंत व्यक्त केली. म्हणून संविधान व या देशाची जबाबदारी तुमच्यावर सोपवित असल्याचे भावनिक मनोगत त्यांनी व्यक्त केले. समारोपीय समारंभात साहित्यिकांसह आंबेडकरी चळवळीत आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यामध्ये लीलाताई चितळे यांच्यासह कुमुद पावडे, संमेलनाच्या संयोजिका छाया खोब्रागडे, डॉ. शांता गवई, गीता महाजन, संबुद्ध महिला संघाच्या संस्थापक सदस्या विमल गाडेकर, यामिनी चौधरी, सुलभा कडू, प्रमोदिनी रामटेके, रिता पोटपोसे, शारदा झामरे, माया उके, दिल्लीच्या पुष्पा विवेक, अनिल वासनिक, सतेश्वर मोरे तसेच आंबेडकरी साहित्य महामंळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कविता खोब्रागडे यांनी तर चारुशीला सोमकुवर यांनी आभार मानले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर