शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश भट सभागृहाच्या भाडेवाढीचा प्रस्ताव : स्थायी समितीकडे प्रस्ताव मंजुरीला पाठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 21:03 IST

महापालिका प्रशासन सभागृहाची भाडेवाढ करण्याच्या विचारात असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. या निर्णयाला विविध संस्थांनी विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्देसामाजिक व शैक्षणिक संस्थांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन मिळावे, सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांना कार्यक्रमांचे आयोजन परवडण्यासारखे असावे, यासाठी रेशीमबाग परिसरात सुसज्ज अशा सुरेश भट सभागृहाची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृहाचे केवळ पाच हजार रुपये भाडे घेण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार भाडे आकारणी होत आहे. परंतु महापालिका प्रशासन सभागृहाची भाडेवाढ करण्याच्या विचारात असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. या निर्णयाला विविध संस्थांनी विरोध दर्शविला आहे.नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हौशी व सामाजिक संस्थांना केवळ पाच हजार रुपयात सभागृह उपलब्ध होते. गेल्या दीड वर्षांत अनेक संस्थांना त्याचा लाभ झाला. कार्यक्रमाचे आयोजन करणे सोयीचे झाले. मात्र आता महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने व सभागृहाचा खर्च बघता भाडे वाढवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. हौशी, सामाजिक संस्थांसाठी १० हजार रुपये तर व्यावसायिक संस्थांसाठी २५ ते हजार ४० हजारापर्यंत शुल्क घेण्यात यावे, असा हा प्रस्ताव आहे. पुढील महिन्यात स्थायी समिती समोर हा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या मालकीचे हे सभागृह असले तरी देखभाल व व्यवस्थापनासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सभागृहातील वाहनतळ खासगी संस्थेला दिले आहे. शहरातील सभागृहाचे भाडे सेवाभावी संस्थांना परवडण्यासारखे नाही. अशा परिस्थितीत भट सभागृहाच्या भाड्यात वाढ झाल्यास अनेक संस्थांची अडचण होणार आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका