शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरवरून गोवा, जयपूर, मुंबई विमानासाठी प्रस्ताव : इंडिगो तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:09 IST

नागपूरहून थेट गोवा, जयपूरकरिता नवीन उड्डाणासाठी इंडिगो एअरलाईन्सने नागरी उड्डायण संचालनालयाकडे (डीजीसीए) प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय मुंबईकरिता नागपुरातून पाचवे नवीन उड्डाणाच्या संचालनासाठी कंपनीने प्राधिकरणाकडे प्रस्ताव ठेवला आहे.

ठळक मुद्दे डीजीसीएकडून मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरहून थेट गोवा, जयपूरकरिता नवीन उड्डाणासाठी इंडिगो एअरलाईन्सने नागरी उड्डायण संचालनालयाकडे (डीजीसीए) प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय मुंबईकरिता नागपुरातून पाचवे नवीन उड्डाणाच्या संचालनासाठी कंपनीने प्राधिकरणाकडे प्रस्ताव ठेवला आहे.नागपूर आणि आसपासच्या शहरातून जयपूर आणि गोवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या पाहता कंपनीने प्रस्ताव सादर केला आहे. कंपनीने पूर्वी नागपुरातून जयपूरकरिता मुंबईमार्गे सेवा दिली होती, पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही सेवा बंद केली होती. गोवाकरिता थेट सेवा मिळावी म्हणून पर्यटकांची नेहमीच मागणी राहिली आहे.या संदर्भात मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी सांगितले की, कंपनीने प्रस्ताव पाठविला आहे. जयपूर येथे उड्डाणांची अधिकता असल्यामुळे कंपनीला स्लॉट उपलब्ध करून देणे शक्य आहे.गोवा येथे नेव्हीचे विमानतळ आहे. या ठिकाणी बहुतांश विदेशी पर्यटक एटीआर विमाने मोठ्या प्रमाणात येतात. डीजीसीए संपूर्ण पैलूंवर विचार करून मंजुरी देते. मुंबई विमानतळ व्यस्त आहे. याआधी इंडिगोने नागपुरातून मुंबईकरिता पहाटे ५.२० वाजता विमान उड्डाणासाठी डीजीसीएकडे प्रस्ताव पाठविला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. मुंबईत दुसरी धावपट्टी असल्यामुळे कंपनीला स्लॉट मिळाला. अशा स्थितीत पुन्हा नवीन उड्डाणासाठी मान्यता मिळविण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गरमीमुळे एटीआर विमानाचे उड्डाण रद्द इंडिगो एअरलाईन्सच्या नागपूर-हैदराबाद विमानाचे टायर गरमीमुळे तापल्यामुळे शनिवारी सायंकाळी ६ वाजता उड्डाण रद्द करावे लागले. कंपनीने प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देत लखनौ येथून दुसरे विमान मागवून हैदराबादला रवाना केले. इंडिगो एअरलाईन्स नागपूर ते हैदराबादकरिता ७२ सीटांच्या एटीआर विमानाचा उपयोग करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाची चाके फ्युजेबल प्लग, थर्मल प्लग आणि बेरिंगमध्ये समस्या आल्यामुळे अत्यंत तापले होते. प्रवाशांची सुरक्षा ध्यानात ठेवून कंपनीने दुसºया विमानाची व्यवस्था केली. अभियंत्यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत विमान दुरुस्त केले. त्यानंतर रविवारी हेच विमान हैदराबादला रवाना करण्यात आले. 

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर