शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पाच कोटींची मालमत्ता हडपली

By admin | Updated: November 18, 2014 00:55 IST

बनावट मृत्युपत्रावर रामदासपेठ येथील पाच कोटींची मालमत्ता हडपल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. धामेचा यांच्या न्यायालयाने एका वकील महिलेसह पाच जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

बनावट मृत्युपत्र : न्यायालयाने वकील महिलेसह पाच जणांना अटकपूर्व जामीन नाकारलानागपूर : बनावट मृत्युपत्रावर रामदासपेठ येथील पाच कोटींची मालमत्ता हडपल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. धामेचा यांच्या न्यायालयाने एका वकील महिलेसह पाच जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. माधव वल्लभदास मोहता (५३), रवी वल्लभदास मोहता (५५) दोन्ही रा. रामदासपेठ, दिलीप वामनराव गुंड रा. सीताबर्डी, आशिष लक्ष्मण गुंडकर आणि अ‍ॅड. अपर्णा विजय दळवी रा. साईमंदिर अयोध्यानगर, अशी आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध २० आॅक्टोबर २०१४ रोजी भादंविच्या ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ४११/२०१४, असा अपराध क्रमांक आहे. कमला श्रीदास मोहता (५२) रा. मोहता निकुंज, रामदासपेठ, असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी, कमला मोहता यांचे पती श्रीदास मोहता यांचे २००३ मध्ये निधन झाले. कमला मोहता यांची सासू मीनादेवी वल्लभदास मोहता या रामदासपेठ येथील मोहता निकुंज या ४८०० चौरस फूट जागेच्या मालकीण होत्या. त्यांचे १६ एप्रिल २०१२ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर या मालमत्तेचे वारस म्हणून श्रीदास वल्लभदास मोहता, रवी वल्लभदास मोहता आणि माधव वल्लभदास मोहता, हे तीन बंधू आहेत. परंतु श्रीदास मोहता हे मरण पावल्याने त्यांची पत्नी कमला मोहता ह्या या मालमत्तेच्या मालकी हिस्स्याची कायदेशीर वारसदार आहे. मालमत्तेतून केले बेदखलकमला मोहता यांना या मालमत्तेतून हुसकावून लावण्यासाठी आरोपींनी बनवाबनवी केली. रवी मोहता आणि माधव मोहता यांनी अ‍ॅड. अपर्णा दळवी, दिलीप गुंड आणि आशिष गुंडकर यांच्याशी संगनमत करून मीनादेवी वल्लभदास मोहता यांच्या नावाचे बनावट मृत्युपत्र तयार करून घेतले. त्यावर मालमत्तेचे वारसदार म्हणून रवी मोहता आणि माधव मोहता यांनी स्वत:चीच नावे नमूद केली. श्रीदास मोहता यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. कमला मोहता यांना या मालमत्तेचा कायदेशीर हिस्सा मिळू नये, यासाठी हे कारस्थान करण्यात आले. त्यांना मालमत्तेतून बेदखल करण्यात आले. अशी उजेडात आली बनवाबनवीसदर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास प्रारंभ केला. मृत्युपत्रावर आर. एस. गुप्ता यांच्या नावाचे नोटरी सील आणि स्टॅम्प होते. पोलिसांनी गुप्ता यांची चौकशी केली असता त्यांनी मृत्युपत्र लेखावरील सील, स्टॅम्प आणि स्वाक्षरी आपली नसल्याचे सांगितले. हे मृत्युपत्र २० जानेवारी २०१२ रोजी तयार करण्यात आले होते. वस्तुत: या तारखेला गुप्ता यांच्या रजिस्टरमध्ये या नावाची कोणतीही नोंद नाही. यावरून हे मृत्युपत्रच बनावट असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. वरपडे हे आहेत. न्यायालयात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर यांनी काम पाहिले.