काटोल: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजच्या काळात अनेक सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वी संघर्षातून अधिकारी घडले आहेत. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षा सुकर मार्ग आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन हेच स्पर्धा परीक्षेच्या यशाचे गमक असल्याचे प्रतिपादन काटोल नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले. काटोल येथील जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्रात त्यांनी ग्रेट भेट उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
बोरीकर म्हणाले की, दरवर्षी चार लाख विद्यार्थी राज्यसेवा परीक्षा देतात. यातील दीड लाख विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतात आणि केवळ ४०० विद्यार्थी अधिकारी म्हणून निवडले जातात. जे विद्यार्थी अभ्यासाचे वेगळ नियोजन करतात, त्यांना हमखास यश मिळते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड होते. शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के व नरेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष सोनटक्के यांनी केले. संचालन केंद्र समन्वयक राजेंद्र टेकाडे तर आभार केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन वाळके, वसीम पठाण, अनुसया रेवतकर, सतीश बागडे आदींनी सहकार्य केले.
या दोन्ही गोष्टी माहीत हव्या
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी अधिकारी का व्हावे व अभ्यास कसा करावा? या दोन प्रश्नांची उत्तरे माहीत हवी. जोपर्यंत इतिहास तपासला जात नाही तोपर्यंत भविष्य घडविता येत नाही, असे बोरीकर यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे. स्वतः नोट्स तयार कराव्यात. स्वतः वर विश्वास ठेवून, कष्ट करण्याची तयारी असेल तर कौशल्यात वाढ होऊन यशाला गवसणी घालता येते.
240921\img-20210921-wa0138.jpg
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्याधिकारी धनंजय बोरीकर