शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शिक्षकांच्या ‘इनोव्हेशन’ला प्रोत्साहन

By admin | Updated: February 10, 2015 00:52 IST

‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभागांमध्ये संशोधनाप्रति उत्साह दिसून येत आहे. ‘मिशन इनोव्हेशन’अंतर्गत विद्यापीठाने

‘पायलट प्रोजेक्टस्’ला देणार बळ : एक लाखापर्यंत निधी देणारनागपूर : ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभागांमध्ये संशोधनाप्रति उत्साह दिसून येत आहे. ‘मिशन इनोव्हेशन’अंतर्गत विद्यापीठाने ‘इनोव्हेटिव्ह रिसर्च अ‍ॅक्टीव्हीटी’चे प्रारूप तयार केले आहे. त्यानुसार विद्यापीठातील विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांनी जास्तीतजास्त प्रमाणात संशोधनाकडे वळावे याकरिता आर्थिक मदत करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. विशेषत: प्राथमिक स्वरूपाचे संशोधन किंवा ‘पायलट प्रोजेक्टस्’ला या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या शिक्षकांना याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळू शकणार आहे.नागपूर विद्यापीठातील विभाग व महाविद्यालयांत संशोधन हवे त्याप्रमाणात होत नाही, अशी नेहमी ओरड करण्यात येते. परंतु हे वातावरण बदलावे यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्ये देखील संशोधन वाढीस लागावे, यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत प्रशासनाने संशोधनाला प्रोत्साहन देणाचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत विद्यापीठाचा कुठलाही विभाग किंवा संलग्नित महाविद्यालयांतील पूर्णवेळ शिक्षक प्रस्ताव सादर करू शकतात. विद्यापीठाने २० फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले आहेत.शिक्षकांकडून अर्ज आल्यानंतर तज्ज्ञ समितीकडून छाननी करण्यात येईल. त्यानंतर निवडण्यात आलेल्या उमेदवारांना समितीसमोर सादरीकरण करावे लागणार आहे व यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. (प्रतिनिधी)कला, वाणिज्यसाठी ५० हजार‘इनोव्हेटिव्ह रिसर्च अ‍ॅक्टीव्हीटी’अंतर्गत शिक्षकांच्या प्राथमिक स्तरावर असलेले संशोधन, ‘पायलट प्रोजेक्ट’वर सुरू असलेले संशोधन यासंदर्भात मदत करण्यात येणार आहे. शिवाय ‘इन्स्ट्रुमेंट्र डेव्हलमेंट’, ‘लॅब टेस्टिंग’ इत्यादीसाठी शिक्षक याअंतर्गत प्रस्ताव पाठवू शकतात, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याअंतर्गत विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, गृहविज्ञान, औषधीविज्ञानशास्त्र शाखेच्या शिक्षकांसाठी संशोधनासाठी एक लाखापर्यंतची मदत करण्यात येणार आहे. तर कला, वाणिज्य, सामाजिक विज्ञान, विधी व शिक्षण शाखेच्या शिक्षकांना विविध प्रकारच्या संशोधन प्रकल्पांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे.