शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नियम गुंडाळून संचालकांच्या नातेवाईकांना पदोन्नती; महापालिका कर्मचारी सहकारी बँकेतील प्रकार

By गणेश हुड | Updated: November 8, 2023 19:02 IST

अध्यक्षांसह माजी संचालकांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचा खातेदारांचा आरोप

नागपूर : महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेने मागील काही वर्षात प्रथमच भागधारकांना डिव्हीडंट वाटप केला नाही. दुसरीकडे २० ते २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना डावलून चार-पाच वर्षापूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यात विद्यमान अध्यक्षांसह माजी संचालकांच्या नातेवाईकांनाचा समावेश आहे. आधिच २०१८ मधील अवैध भरतीचे प्रकरण न्यायालयात असताना या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ कसा दिला असा सवाल बँकेचे भागधारक दीपक मोहन स्वामी यांनी केला आहे.

२०१८ मध्ये बँकेत कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. यात तत्कालीन संचालकांच्या नातेवाईकांची प्रामुख्याने निवड करण्यात आली. यात विद्यमान अध्यक्ष ईश्वर मेश्राम यांचा मुलगा शुभम मेश्राम, माजी संचालक दिलीप देवगडे, वसंत पाटील, राधेश्याम निमजे, राजेंद्र ठाकरे, विजय काथवटे, विठ्ठल क्षीरसागर यांच्यासह अन्य संचालकांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. बँकेत प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची निवड करण्यात आली होती. या विरोधात काही भागधारक न्यायालयात गेले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप दीपक स्वामी यांनी केला आहे. बँकेत मागील २५ ते ३० वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतून वगळून नवीन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. दोन वर्षापूर्वी या बँकेतील संगणक घोटाळा गाजला होता. यात शासनाचा लाखो रुपयांचा जीएसटी बुडाला होता. काही दिवसापूर्वी विशेष सभेत सदस्यांनी बॉयलाजनुसार बँकेचे कामकाज चालत नसून अध्यक्षांच्या मर्जीनुसार कारभार सुरू आहे. अधिकार नसतानाही नवीन समित्यांची नियुक्ती केल्याचा आरोप सदस्यांनी केला होता.सहा वर्षापासून पदोन्नती दिली नव्हतीमनपा कर्मचारी सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना मागील सहा वर्षात पदोन्नती मिळाली नव्हती. त्यामुळे सेवाज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता विचारात घेवून पदोन्नती देण्यात आली आहे. बँकेत भरती प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली होती. यात उत्तीर्ण झालेल्यांची निवड करण्यात आली.-ईश्वर मेश्राम, अध्यक्ष, मनपा कर्मचारी सहकारी बँकपदोन्नती नियमानुसारचनियमानुसार सेवा ज्येष्ठता व उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. बँकेत आर्थिक व्यवहार होतात. आरोपामुळे त्यावर परिणाम होतो. ही सहकारी बँक आहे. सहकाराच्या तत्वावर कामकाज चालते.-मनिष बोडखे, मुख्यकार्यकारी अधिकारी, कर्मचारी सहकारी बँक

टॅग्स :nagpurनागपूर