शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जपानी होरिबा कंपनीचा बुटीबोरी एमआयडीसीत प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:01 IST

जपानी होरिबा इंडिया कंपनीचा प्रकल्प बुटीबोरी एमआयडीसीमध्ये उभा राहणार आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्घाटन १५ जुलैला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.

ठळक मुद्दे १५ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : २०० कोटी रुपयांची गुंतवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जपानी होरिबा इंडिया कंपनीचा प्रकल्प बुटीबोरी एमआयडीसीमध्ये उभा राहणार आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्घाटन १५ जुलैला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे असतील. होरिबा इंडियाचे चेअरमन डॉ. जय हाकू, होरिबा इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. राजीव गौतम प्रामुख्याने उपस्थित असतील. हा प्रकल्प २०१९ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. कंपनीचे जगातील अनेक देशांमध्ये उद्योगांचे जाळे असून विविध उत्पादनांमध्ये अग्रेसर आहे.साधारणत: दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे जिल्ह्यातील चाकण येथे छोटी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी गेले असताना समारंभात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जपानी कंपनीचा २०० कोटी रुपये गुंतवणुकीचा मोठा प्रकल्प आता नागपुरात येऊ घातला आहे. उद्घाटन समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होरिबा कंपनीने नागपुरात गुंतवणूक केल्यास राज्य शासन संपूर्ण मदत करेल, अशी हमी दिली होती. त्या समारंभात उपस्थित असलेले कंपनीचे संस्थापक आत्सुशी होरिबा, होरिबा इंडियाचे चेअरमन डॉ. जय हाकू यांनी त्यास काहीच दिवसात प्रतिसाद देत नागपुरात प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला नागपुरात गुंतवणूकीची प्रेरणा मिळावी, अशी भावना डॉ. हाकू यांनी व्यक्त केली.नागपूर प्रकल्पात रक्तातील पेशी तपासण्यासाठीचे सेल काऊंटर मशीनचे उत्पादन तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनाचे उत्पादन होईल. तसेच जागतिक दर्जाच्या सेंट्रल वेअर हाऊसची उभारणी केली जाईल. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक २०० कोटी रुपयांची असेल. हा प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत कार्यान्वित होईल. दुसऱ्या टप्प्यात अधिक मोठी गुंतवणूक असेल. या प्रकल्पात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक हजार जणांना रोजगार मिळेल. होरिबा इंडियाच्या भारतातील कुठल्याही प्रकल्पापेक्षा ही सर्वात मोठी गुंतवणूक असेल. जगभर उद्योगांचे जाळे असलेल्या होरिबा लिमिटेडमध्ये सध्या दहा हजार जण कार्यरत आहेत.

टॅग्स :JapanजपानDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस