शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकाची भूमिका संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:45 IST

नरेंद्रनगरातील रहिवासी प्रा. मोरेश्वर वानखेडे यांच्या हत्याकांडातील आरोपीसोबत एका प्राध्यापकाची सलगी उघड झाली आहे.

ठळक मुद्देअनिताशी सलगीसाठी धडपड : पोलिसांकडून चौकशी, शिक्षण क्षेत्रात खळबळ

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरेंद्रनगरातील रहिवासी प्रा. मोरेश्वर वानखेडे यांच्या हत्याकांडातील आरोपीसोबत एका प्राध्यापकाची सलगी उघड झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी ‘त्या’ प्राध्यापकाचीही भूमिका तपासणे सुरू केले आहे. प्रा. वानखेडे-अनिता आणि तो प्राध्यापक यांच्या वादग्रस्त तसेच ‘नाजूक संबंधांची’ पोलीस चौकशी करीत असल्याची चर्चा कर्णोपकर्णी सर्वत्र पसरल्यामुळे शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.चंद्रपुरातील महाविद्यालयात प्राचार्य असलेले मोरेश्वर वानखेडे यांची शुक्रवारी पहाटे ४.३० ते ५ च्या सुमारास मारेकºयांनी निर्घृण हत्या केली. भर रस्त्यावर एका प्राचार्याची हत्या झाल्यामुळे विदर्भाच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. बजाजनगर पोलिसांनी या हत्याकांडाची सुपारी घेऊन मारेकºयांची जमवाजमव करणाºया शुभम ऊर्फ बंटी मोहुर्ले (२२, रा. हिंगणा नीलडोह) तसेच प्रा. वानखेडे यांची मुलगी सायली तिची आई अनिता, अंकित रामलाल काटेवार (१९), शशिकांत ऊर्फ सोनू चंद्रकांत चौधरी (१९), सागरसिंग ऊर्फ पाजी ऊर्फ बाला कपूरसिंग बावरी या आरोपींना अटक केली. अंकुश बडगे फरार आहे. त्यांच्या चौकशीतून या हत्याकांडाची मास्टर मार्इंड वानखेडेंची मुलगी सायली हीच असल्याचे आणि तिनेच आईला या हत्याकांडाची कटात सहभागी करण्यास प्रवृत्त केल्याचे उघड झाले आहे. सायलीचे बंटीसोबत विवाहबाह्य संबंध होते. हे तिच्या चौकशीतून स्पष्ट झाले. दुसरे म्हणजे, एक प्राध्यापक सतत प्रा. वानखेडेंच्या घरावर डोळा ठेवून असल्याचेही पोलिसांना कळले आहे.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रा. वानखेडे यांच्यासोबत अनिताचे २३ मे १९८९ ला लग्न झाले. लग्नाच्या काही वर्षांनंतरपासून सुस्वरूप अनितासोबत सलगी वाढविण्यासाठी ‘त्या’ प्राध्यापकाची धडपड सुरू झाली. हे कळल्यानंतर प्रा. वानखेडे, अनिता आणि प्राध्यापक यांच्या संबंधांची पोलिसांनी चौकशी सुरू केली असता दोन महत्त्वाचे मुद्दे समोर आले. त्यातील पहिला राजस्थान ट्रीपचा आहे.डिसेंबर २०१७ मध्ये काही प्राध्यापक-शिक्षक-शिक्षिकांची सहपरिवार सहल आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रा. वानखेडे, त्यांची पत्नी अनिता आणि मुलगा या तिघांचीही नावे होती. उदयपूर, जयपूरला(राजस्थान) जाण्या-येण्याचे तिकीटही कन्फर्म झाले होते. या सहलीत तो प्राध्यापक असल्याचे कळल्याने ऐनवेळी प्रा. वानखेडे यांनी महत्त्वाचे शैक्षणिक काम आल्याने सांगून पत्नीला सहलीचा कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले. मात्र, अनिताने त्यांना दाद दिली नाही. तिने मुलासोबत उदयपूरला जाण्याचा हट्ट धरला. पतीचा विरोध डावलून अन्य जणांसोबत ती निघून गेली. तिला या प्राध्यापकानेच फूस लावल्याचा समज झाल्यामुळे प्रा. वानखेडेंनी त्याला नंतर फोन केला आणि त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. अनिताला पळवून नेल्याचा आरोप करणारी तक्रार पोलिसांकडे नोंदवतो, अशीही धमकी दिली होती. त्यामुळे हादरलेल्या या प्राध्यापकाने नंतर अन्य मित्रांच्या मदतीने प्रा. वानखेडेंना कसेबसे शांत केले. या प्राध्यापकाला प्राचार्य वानखेडे अजिबात पसंत करीत नव्हते. त्यानंतरही या प्राध्यापकाची अनितासोबत वेगवेगळ्या पद्धतीने जवळीक साधण्याची धडपड सुरूच होती. पोलीस तपासात हा भाग उघड झाल्यामुळे या हत्याकांडात प्राध्यापकाची काही भूमिका आहे का, त्याची गोपनीय चौकशी पोलीस करीत आहेत.बर्थडे पार्टीचा तंटाकाही दिवसांपूर्वी प्रा. वानखेडे यांच्याकडे आराध्याची बर्थडे पार्टी झाली. या दिवशी नेहमीप्रमाणे प्रा. वानखेडे भल्या सकाळी चंद्रपूरला निघून गेले होते. त्यांना बर्थडे पार्टीची कोणतीही कल्पना नव्हती. रात्री घरी परतल्यानंतर त्यांना जेवणाच्या उष्ट्या प्लेटा दिसल्या. त्यामुळे प्रा. वानखेडें संतप्त झाले. त्यानंतर त्या प्राध्यापकाचीही बर्थडे पार्टीत उपस्थिती असल्याचे त्यांना कळले. त्यामुळे नंतर त्यांच्या घरात चांगलाच तंटा झाला. मी घरातील प्रमुख असून मला पार्टीची माहिती नाही अन् तो (प्राध्यापक) येथे कसा हजर झाला, असा प्रश्न करून प्रा. वानखेडेंनी पुन्हा एकदा त्या प्राध्यापकाची कानशेकणी केली होती, असेही पोलीस सूत्रांचे सांगणे आहे.