शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

मिरवणुकीला लागले गालबोट

By admin | Updated: April 12, 2017 02:11 IST

हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला जिल्ह्यात गालबोट लागले.

खाप्यात तरुणाचा खून : कामठीत विजेच्या धक्क्याने मृत्यूखापा/कामठी : हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला जिल्ह्यात गालबोट लागले. सावनेर तालुक्यातील खापा येथे सोमवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजेवरून दोन गटात वाद उद्भवला आणि याच वादातून तरुणाचा खून करण्यात आला. त्यामुळे खाप्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांचा पोलीस प्रशासनावर असलेला रोष पाहता मृत तरुणावर मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. कामठी शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान तरुणाच्या हाती असलेल्या झेंड्याचा स्पर्श रेल्वेच्या उच्च दाब वाहिनीला झाला आणि तरुणाला जोरदार विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.सावनेर तालुक्यातील गुमगाव माईन्सच्यावतीने सोमवारी सायंकाळी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक होती. रात्री ७.३० वाजताच्या सुमारास ही मिरवणूक खापा शहरातील नवीन वस्तीत पोहोचली. मिरवणुकीतील डीजेवरून दोन गटात वाद उद्भवला. त्यात दुसऱ्या गटातील तरुणांनी पंकज गुलाब ऊर्फ गोपाल जुनघरे (२२, रा. नवीन वस्ती, खापा) यास मारहाण ेकेली. खापा पोलिसांनी मध्यस्थीनंतर वाद मिटला. काही वेळाने तरुणांनी महात्मा गांधी प्राथमिक शाळेच्या मागे पंकजला पुन्हा मारहाण केली. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे पोलीस ठाण्यावर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शेरखाने यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस कुमक बोलवण्यात आली होती. (प्रतिनिधी)सहा संशयितांना घेतले ताब्यातया प्रकरणात खापा पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात गणेश यादव, रा. गुमगाव माईन, शुभम बावनकुळे, रा. नवीन वस्ती, सतीश जत्रे, अखिलेश गडपाल, निखील यादव, गुड्डू पंतिया, सर्व रा. गुमगाव माईन याचा समावेश आहे. या सहा जणांसह गुड्डूच्या मित्राने पंकजला मारहाण केली. ‘धक्का का मारला’ यावरून त्याला मारहाण करण्यात आली. त्यात पंकज बेशुद्ध पडला व नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि १४३, १४७, १४९, ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास खाप्याचे ठाणेदार प्रवीण वांगे करीत आहेत. पोलीस अधीक्षकांना निवेदनमृत पंकजच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची खापा पोलीस ठाण्यात भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी तसेच सदर प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी या निवेदनात केली. या घटनेतील आरोपींना अटक करण्यात येईल तसेच त्यांना योग्य ती शिक्षा मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पंकजच्या कुटुंबीयांना दिले.पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कारपंकज जुनघरे हा ट्रकवर मजुरी करायचा. वडिलांच्या निधनानंतर तो आई, बहीण व दोन भावांसोबत राहायचा. तो सर्वात लहान होता. नागरिकांच्या भावना विचारात घेत नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले. मंगळवारी दुपारी मृतदेह खाप्यात आणल्यानंतर सायंकाळी ४ वाजता पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खाप्यात शीघ्रकृती दलासह अतिरिक्त पोलीस तैनात केले होते. वरीष्ठ पोलीस अधिकारी हजर होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास खाप्याला भेट दिली. त्यांच्या या आकस्मिक भेटीमुळे पोलीस अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. अर्ध्या तासाच्या दौऱ्यात त्यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. फुटबॉलपटूचा मृत्यूकामठी : हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या मोटरसायकल रॅलीत सहभागी तरुणाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना कामठीच्या रमानगरात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. वैष्णव ऊर्फ इसू सदन यादव (२३, रा. गवळीपुरा, कामठी) असे मृत तरुणाचे नाव आहे. भाजीमंडी येथील हनुमान मंदिरातून सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास निघालेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये तो सहभागी झाला होता. ही रॅली बोरकर चौक, गोयल टॉकीज चौक, गांधी चौक, जयस्तंभ चौकमार्गे बालाजी मंदिर येथे जात होती. दरम्यान डीजे असलेल्या वाहनात वैष्णव लोखंडी रॉडमध्ये झेंडा घेऊन उभा होता. ही रॅली रमानगर रेल्वे फाटक ओलांडत असताना वैष्णवच्या हातातील झेंड्याचा रेल्वेच्या उच्च दाबाच्या वीज तारांना स्पर्श झाला. वीज तारांना झेंडा लागताच स्फोटासारखा आवाज होऊन वैष्णवचा डावा हात भाजून तो खाली कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी नोंद केली आहे. या घटनेत मृत्यू झालेला वैष्णव हा नॅशनल फुटबॉल क्लबचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून परिचित होता. फुटबॉलमध्ये त्याने नागपूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. अनेक स्पर्धा त्याने गाजविल्या. दोनच दिवसांपूर्वी पुणे येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळून तो परत आला होता. तो माधवराव वानखेडे महाविद्यालयात बी.पी.ई. द्वितीय वर्षाला शिकत होता. त्याच्यापश्चात आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. (तालुका प्रतिनिधी)