शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'वर्क फ्रॉम होम'ला येताहेत इंटरनेटची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 22:31 IST

कॉर्पोरेट कंपन्या, शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि इंटरनेटद्वारे होणारी कामे असे सर्व कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरी बसून काम करीत आहेत. पण हे काम करीत असताना इंटरनेटचा फटका कामाला बसतो आहे. इंटरनेटची स्पीड स्लो असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्दे‘नेटवर्क स्लो’मुळे कर्मचारी त्रस्त : इंटरनेट सेवेकडे शासनाने लक्ष देण्याची गरज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा भारतावरसुद्धा मोठा परिणाम झाला आहे. अनेकांना घरातच बंदिस्त करण्यात आले आहे. कॉर्पोरेट कंपन्या, शासकीय कर्मचारी, शिक्षक आणि इंटरनेटद्वारे होणारी कामे असे सर्व कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरी बसून काम करीत आहेत. पण हे काम करीत असताना इंटरनेटचा फटका कामाला बसतो आहे. इंटरनेटची स्पीड स्लो असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे.सध्या घरात असलेल्या प्रत्येकजण हा इंटरनेटवर अ‍ॅक्टिव्ह आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटरच्या माध्यमातून माहितीचे आदानप्रदान करीत आहे. देशभरातील लॉकडाऊनमध्ये इंटरनेट हे एक सशक्त माध्यम झाले आहे. त्याच आधारावर अनेक कॉर्पोरेट कंपन्या, शासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ला मुभा दिली आहे. एकाच वेळी सर्वच इंटरनेट वापरत असल्याने नेटच्या स्पीडवर परिणाम झाला आहे. त्यामुळे घरात बसून ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या आधारे कर्मचारी ई-मेल पाठविणे, अहवाल पाठविणे, अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, ई-मेलद्वारे पत्रव्यवहार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग व सुनावणी, शासकीय निर्णय, शाळा महाविद्यालयांचे निकाल जाहीर करणे, त्याची प्रत पाठविणे आदी कामे सध्या इंटरनेटने सुरू आहेत.इंटरनेटच्या माध्यमातून अनेक कामे करताना स्पीड कमी असल्यामुळे तासन्तास एखादी फाईल डाऊनलोड व अपलोड होण्यासाठी वेळ लागत आहे. आणीबाणीच्या काळात शासनाचे काम अधिक जलद गतीने सामान्य कर्मचारी आणि नागरिक यांच्याकडून होण्यासाठी शासनाने इंटरनेट सेवेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 

सरकारने इंटरनेट सेवा नि:शुल्क करण्याची मागणीसध्या आणीबाणीचा काळ आहे. वर्क फ्रॉम होम हे अत्यंत लाभदायक आहे. लोकांना इंटरनेटची इतकी सवय झाली की, घरात असताना नेटमुळे कंटाळा येत नाही. वर्क फ्रॉम होममुळे शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची गर्दी कमी झाली आहे. लॉकडाऊनच्या स्थितीत अतिशय उपयुक्त ठरणारी सेवा असल्याने, शासनाने इंटरनेटची गती व सेवाही नि:शुल्क करण्याची मागणी प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष हेमंत गांजरे यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternetइंटरनेट