शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

नागपूर पोलिसांची कृतिशील संवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 00:39 IST

लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली फटकेबाजी अनुभवली असेल. त्यांच्याकडून अनेकांवर कठोर कारवाई होतानाही बघितले असेल. या लॉकडाऊनमध्ये पोलिसांचे दुसरेही रूप समाजाला बघायला मिळाले. ते म्हणजे पोलिसांत असलेली संवेदनशीलता.

ठळक मुद्देसमन्वयकाच्या भूमिकेतून १५ लाख लोकांपर्यंत पोहचविली मदत१३२ सेवाभावी संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली फटकेबाजी अनुभवली असेल. त्यांच्याकडून अनेकांवर कठोर कारवाई होतानाही बघितले असेल. या लॉकडाऊनमध्ये पोलिसांचे दुसरेही रूप समाजाला बघायला मिळाले. ते म्हणजे पोलिसांत असलेली संवेदनशीलता. नागपुरात एकही माणूस उपाशीपोटी झोपणार नाही यासाठी नागपूर पोलीस झटत आहे. पोलिसांनी सामाजिक संघटनांना एकत्र करून समन्वयकाच्या भूमिकेतून १५ लाख लोकांना अन्नधान्य, धान्यवाटप व जीवनावश्यक वस्तू पुरविल्या आहेत.कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतानाच लॉकडाऊनमुळे असंख्य नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यासोबतच जिल्ह्याची सीमाबंदी केल्यामुळे हजारो मजूर आहे तेथे अडकून पडले. या पार्श्वभूमीवर शासनाने निवासगृहे सुरु केली. परंतु हातावर पोट असलेल्या नागरिकांपुढे दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. सामाजिक जबाबदारी स्वीकारत विविध स्वयंसेवी संस्थांनी मदत सुरू केली. परंतु ही मदत एका विशिष्ट भागापुरतीच मर्यादित असल्यामुळे नागपूरचे अप्पर पोलीस महानिरीक्षक नीलेश भरणे यांच्या संकल्पनेतून सामाजिक संस्थांमध्ये समन्वय ठेवण्यसाठी ‘पोलीस वॉर रुम’ तयार करण्यात आली.याद्वारे सामाजिक संस्थांच्या वितरणावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. तसेच शहरातील गरीब व गरजवंत वस्त्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करण्यात आले. यामध्ये रेड, आॅरेंज व ग्रीन अशी विभागणी करण्यात आली. त्यानुसार शहरातील नोंदणी केलेल्या १३२ संस्थांच्या मदतीची विभागणी करण्यात आली. या संस्थामार्फत दररोज ९५ हजार ते १ लाख लोकांपर्यंत शिजविलेल्या अन्नासह विविध साहित्यांचे वाटप होत आहे.सायबर सेल बनले वॉर रुमनागपूर पोलिसांचा सायबर सेल सामाजिक संस्थांसाठी वॉर रुम बनले आहे. त्यासाठी दोन सहायक पोलीस अधीक्षक, सात पोलीस कर्मचारी भुकेल्यांपर्यंत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी अविरत काम करत आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील मजूर आणि कामगार वर्गाची उपासमार होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी या संपूर्ण मानवी कार्यात समन्वयक बनण्याचे ठरविले. मदत करणाऱ्या संस्थांची यादी तयार करुन, त्यांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप तयार केले आणि प्रत्येक संस्थेला विशिष्ट भागाची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार भोजन व धान्याची गरज लक्षात घेऊन माहिती संकलित करण्याचे आणि संबंधित संस्थेला ती पोहचविण्याची जबाबदारी नागपूर पोलिसांनी उचलली आहे.ही मदत कोरोना विरुद्धच्या लढ्यात निर्णायक ठरू शकेलविशेष म्हणजे पोलीस या संपूर्ण मदत कार्याची नोंद ठेवत आहे. आजच्या घडीला दररोज एक लाख लोकांना मदत केली जात आहे. शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. तोपर्यंत पोलीस समन्वयकाच्या भूमिकेतून सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने कार्य सुरू ठेवणार आहे. राज्यात पहिल्यांदाच पोलीस विभागातर्फे मदतीचे काम होत आहे. कोरोना विरोधातील लढ्यात पोलिसांची ही मदत निर्णायक ठरु शकेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस