शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर उपचार करीत असलेल्या खासगी रुग्णालय डॉक्टरांनाही पुरवा सुरक्षा साधने : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:39 IST

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला.

ठळक मुद्देअंमलबजावणीसाठी दिली एक आठवड्याची मुदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करीत असलेल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिला. खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये संचालित करणाऱ्यांनी संबंधित सुरक्षा साधने पुरवायची असून त्यासाठी त्यांना एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालकांनी या आदेशाची माहिती सर्वांना द्यावी असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.सरकारी रुग्णालयांचा सर्वांगीन विकास व्हावा याकरिता सी. एच. शर्मा व इतरांनी वर्ष २००० मध्ये दाखल केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात सध्या देशाला संकटात ओढणाऱ्या कोरोना आजारावरील उपाययोजनांचा मुद्दा हाताळला जात आहे. गेल्या २३ मार्च रोजी उच्च न्यायालयाने सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे याकरिता त्यांना एक आठवड्यात आवश्यक सुरक्षा साधने पुरविण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. या प्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी गुरुवारी ही याचिका तातडीने सुनावणीसाठी आणून खासगी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठीही असाच आदेश देण्याची विनंती केली. कोरोना बाधित रु ग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अनेक रुग्णांवर खासगी रुग्णालयांतही उपचार केले जात आहेत. परंतु, तेथील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात आली नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना कोरोनाची लागन होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसे झाल्यास कोरोना नष्ट करण्याचे प्रयत्न निष्प्रभ ठरतील याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांना या मुद्यांमध्ये तथ्य आढळून आले. त्यामुळे त्यांनी वरील आदेश दिला. कोरोना नष्ट करण्यासाठी सर्व बाजूने गांभिर्याने उपाययोजना केल्या जात आहेत. अशावेळी कुठेही त्रुटी ठेवल्यास सर्व प्रयत्न निरर्थक ठरतील. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सुरक्षा साधने मिळणे काळाची गरज आहे असे मत न्यायालयाने हा आदेश देताना व्यक्त केले. राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी तर, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर