शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

छिंदवाडा येथील खाजगी रुग्णालयाने ब्रेनडेड रुग्णाला केले मृत घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 10:02 IST

नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाला छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयाने मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देमृत्यूअगोदरच पोहचला शवागारातलक्षात आल्यावर नागपूरच्या रुग्णालयात केले दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/ छिंदवाडा : नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने ब्रेनडेड (मेंदूमृत) घोषित केलेल्या रुग्णाला छिंदवाडा येथील जिल्हा रुग्णालयाने मृत घोषित करून शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. मेंदूमृत रुग्ण जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा नागपूरच्या एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, ब्रेनडेड रुग्ण तब्बल चार तास शवागारात होता.मिळालेल्या माहितीनुसार, छिंदवाडा येथील रहिवासी हिमांशु भारद्वाज (३०) रविवारी दुपारी रस्ता अपघातात जखमी झाला. छिंदवाडा येथून त्याला नागपुरात पाठविण्यात आले. रात्री साधारण १ वाजता धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासून ‘ब्रेनडेड’ घोषित केले. सोबतच नातेवाईकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहितही केले. यासाठी हिमांशुला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यावेळेपर्यंत हिमांशुचे हृदय आणि इतर अवयव काम करीत होते. मात्र, नातेवाईक हिमांशुला छिंदवाडाला घेऊन गेले. सकाळी साधारण ५ वाजता छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. ठाकूर यांनी तपासणी करून हिमांशुला मृत घोषित केले. त्यानंतर ब्रेनडेड रुग्णाला शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवले. सोमवारी सकाळी ९ वाजता शवविच्छेदनासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सफाई कर्मचारी शवागारातून हिमांशुचे शव बाहेर काढण्यासाठी आला. त्यावेळी हिमांशुच्या शरीरात त्याला हालचाली जाणवल्या. त्याने लागलीच याची माहिती शवविच्छेदनासाठी आलेले डॉ. निर्णय पांडे यांना दिली. त्यांनी तातडीने शस्त्रक्रियाच्या वॉर्डात नेऊन आपल्या सहकारी तज्ज्ञाच्या मदतीने तपासणी करून उपचार सुरू केले.

अहवालात नाडीचे स्पंदन बंद असल्याची नोंदकर्तव्यावर असलेले डॉ. ठाकूर यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे की, ज्या अवस्थेत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये आणले त्यावेळी त्याच्या नाडीचे स्पंदन बंद होते. हृदयाने काम करणे बंद केले होते. या आधारवर त्याला मृत घोषित केले.-डॉ. सुशील दुबेवैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, छिंदवाडा

ब्रेनडेड होणे म्हणजे मृत्यू नाहीब्रेनडेड होणे म्हणजे रुग्णाचा मृत्यू होणे असे नाही. ब्रेनडेड झाल्यावरही रुग्णाचे हृदय आणि इतर अवयव कार्य करीत असतात. या प्रकरणातही असे झाले असावे.-डॉ. जय देशमुख, वरिष्ठ विशेषज्ञ

टॅग्स :Healthआरोग्य