शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कैदी भेटू शकणार नाहीत कुटुंबीयांशी; नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 11:48 IST

नागपूर कारागृह प्रशासनाने ‘अलर्ट’ जारी केला असून, बुधवारपासून कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी भेटण्यावर अंकुश लावला आहे. न्यायालयात व मेडिकलला जाणाऱ्या कैद्यांना हात स्वच्छ केल्यानंतरच जेल परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.

ठळक मुद्देकोरोना संक्रमणामुळे प्रशासनाकडून ‘अलर्ट’

जगदीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणाचा फटका कारागृहातील कैद्यांनाही बसला आहे. कारागृह प्रशासनाने ‘अलर्ट’ जारी केला असून, बुधवारपासून कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी भेटण्यावर अंकुश लावला आहे. न्यायालयात व मेडिकलला जाणाऱ्या कैद्यांना हात स्वच्छ केल्यानंतरच जेल परिसरात प्रवेश दिला जाणार आहे.नागपूरच्या कारागृहात आतंकवाद्यासह नक्षलवादीसुद्धा आहेत. कारागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची संख्या आहे. १८४० क्षमता असलेल्या नागपूरच्या कारागृहात २४५० कै दी वास्तव्यास आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी कारागृहाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. त्याची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारागृह प्रशासनाला उपाययोजना करण्याचे सुचविले आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून कारागृहातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयाशी भेटण्यावर अंकुश लावला आहे. कैद्यांशी भेट घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने त्यांचे कुटुंबीय येतात. पण कोरोनाच्या भीतीपोटी कुटुंबीयांच्या भेटी थांबविण्यात आल्या आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून आणि कैद्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दररोज मोठ्या संख्येने कैदी पेशीसाठी न्यायालयात जातात. उपचारासाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात येते. या दरम्यान कैदी लोकांच्या संपर्कात येतात. येथून परत आल्यानंतर कैद्यांना हात स्वच्छ धुण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. कारागृहात ३५ बॅरेक आहे. प्रत्येक बॅरेकमध्ये कैद्यांना साबण व हॅण्डवॉश दिला आहे. कैद्यांचे कपडे, त्यांच्या चादरी धुण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. कारागृहात दर शुक्रवारी आरोग्य शिबिर लावण्यात येते. गृहमंत्र्यांच्या आदेशाने मेडिकल व लता मंगेशकर रुग्णालयाला शिबिर लावण्याची विनंती केली आहे. कैद्यांना नियमित कोरोनापासून सावधगिरी बाळगण्याची माहिती दिली जात आहे. कैद्यांच्या नियमित संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क दिले आहे. कारागृहात २० बेडचे रुग्णालय आहे. तिथे डॉक्टर व मेडिकल स्टाफला अलर्ट राहण्यास सांगितले आहे. कुठला कैदी पॉझिटिव्ह आल्यास त्याच्यासाठी ७ विशेष वॉर्ड तयार करण्यात आले आहे.

प्रत्येक कैद्यांची होणार स्क्रिनिंगगृहमंत्र्याच्या आदेशानुसार कारागृह प्रशासनाने बुधवारी पाच डिजिटल स्क्रिनिंग थर्मामीटरची खरेदी करण्यात येणार आहे. याद्वारे प्रत्येक कैद्याची तपासणी होणार आहे. कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे म्हणाले, कारागृह प्रशासन या आपत्तीला निपटण्यासाठी तयार आहे. बुधवारी प्रायोगिक तत्त्वावर ५ डिजिटल स्क्रिनिंग थर्मामीटर खरेदी करण्यात येईल. त्यानंतर स्क्रिनिंगला सुरुवात होईल. कारागृहात स्वच्छता ठेवण्यासाठी उपाय केले आहेत. कारागृहातील मेडिकल टीम २४ तास अलर्ट आहे. आजारी कैद्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस