शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना कारागृहातच तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा

By admin | Updated: June 16, 2017 02:07 IST

मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांना आता कारागृहातच राहून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील

मेडिकलमध्ये कैद्यांवर टेलिमेडिसीनद्वारे उपचार : राज्यातील दुसरा प्रयोग नागपुरातसुमेध वाघमारे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांना आता कारागृहातच राहून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टरांची वैद्यकीय सेवा मिळणार आहे. येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपचार करण्यात येणारी ‘टेलिमेडिसीन’ सुविधा सोमवारपासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत २० कैद्यांना याचा लाभ मिळाला आहे. यामुळे कैद्यांचे पळून जाण्याच्या प्रकरणांवर काही प्रमाणात अंकुश लागण्याची शक्यता आहे. शिवाय, कैद्यांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवाही मिळणार आहे.राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत. प्रत्येक मध्यवर्ती कारागृहात एक इस्पितळ आहे. येथे रुग्णांची प्राथमिक स्तरावर तपासणी केली जाते. मात्र आजार बळावल्यास त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. उपचारासाठी येणाऱ्या कैद्यांच्या दिमतीला कारागृहाचे मनुष्यबळ तसेच पोलीस यंत्रणा राबते. रुग्णालयामधून कैदी पळून जाऊ नये म्हणून २४ तास पोलिसांचा पहारा असतो. इतर रुग्णांसाठी व रुग्णालयाच्या कामकाजात याचा अडथळा होतो. यात पैसा आणि मनुष्यबळ खर्च होते. अनेक वेळा रुग्णालयांमधून कैदी पळून गेल्याच्या घटनाही घडतात. यावर उपाय म्हणून कारागृह प्रशासनाने आजारी कैद्यांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपचार करण्यात येणारी ‘टेलिमेडिसीन’ वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात २०१५ मध्ये औरंगाबाद येथून झाली तर आता हाच प्रयोग १२ जून २०१७ पासून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातही सुरू झाला आहे. राज्यातील हा दुसरा प्रयोग ठरला असून लवकरच इतरही कारागृहात हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या कारागृहातील २० कैद्यांवर उपचारनागपुरातील कारागृहात सध्याच्या स्थितीत शिक्षा झालेले आणि कच्चे असे सुमारे २२०० कैदी आहेत. उपचाराच्या निमित्ताने त्यांना वेळोवेळी मेडिकलमध्ये दाखल केले जाते. उपचारासाठी येणारे कैदी पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्याचा नेहमीच धोका असतो. याला घेऊन राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी यासंदर्भात मेडिकलला ‘टेलिमेडिसीन’ची सुविधा सुरू करण्याबाबत एप्रिल २०१७ मध्ये पत्र पाठविले. तांत्रिक अडचणीतून मार्ग काढीत आता हा प्रकल्प सुरू झाला आहे. १२ जून ते आतापर्यंत २० रुग्णांना याचा फायदा झाला असून यात सर्वाधिक रुग्ण हे औषधवैद्यकशास्त्र विभाग व त्वचारोग विभागाचे होते. असा आहे प्रकल्पनागपूरचे मध्यवर्ती कारागृह व मेडिकल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यात आले आहे. आजारी कैद्याला कारागृहातील इस्पितळामध्ये दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी निदान न झाल्यास तेथील डॉक्टर मेडिकलमधील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधतील. त्यांना आजारी कैदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखविण्यात येईल. यावेळी आजारी कैद्याशी तज्ञ डॉक्टर प्रत्यक्ष संवाद साधतील. त्यानंतर तुरुंगातील डॉक्टरांना उपचाराबाबत मार्गदर्शन करतील. त्यानुसार कैद्यांवर उपचार होतील. त्यामुळे आजारी कैद्यांना तुरुंगाच्या बाहेर आणावे लागणार नाही.