शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमधून पळाला कैदी रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 20:39 IST

सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला एक कैदी रुग्ण शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पळून गेल्याने खळबळ उडाली. श्वसन रोग विभागाच्या वॉर्ड ४३मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. तो क्षयरोगाचा जुना रुग्ण होता. त्याला उपचारासाठी हैदराबाद पोलिसांनी नागपुरात आणले होते.

ठळक मुद्देहैदराबाद येथून नागपुरात आणले होते उपचाराला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपर स्पेशालिट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला एक कैदी रुग्ण शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पळून गेल्याने खळबळ उडाली. श्वसन रोग विभागाच्या वॉर्ड ४३मध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. तो क्षयरोगाचा जुना रुग्ण होता. त्याला उपचारासाठी हैदराबाद पोलिसांनी नागपुरात आणले होते.चिजो चंद्रन नादार (३७) असे त्या कैदी रुग्णाचे नाव.प्राप्त महितीनुसार, चिजोला ठशातून रक्त जात असल्याने हैदराबाद पोलिसांनी त्याला ४ जुलै रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्वसन रोग विभागात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी तपासल्यावर हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरील विभागाच्या वॉर्ड ४३ मध्ये त्याला दाखल केले. शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास परिचारिकेने त्याला औषधे दिली. सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान निवासी डॉक्टर ‘बीपी’ घेण्यासाठी आले असताना चिजो आपल्या खाटेवर नव्हता. सकाळची वेळ असल्याने शौचालयाला गेला असेल, असे समजून इतर रुग्णांचे डॉक्टरने बीपी घेतले. परंतु बराच वेळ होऊनही रुग्ण जागेवर आला नसल्याने शोधाशोध सुरू झाली. रुग्ण कुठेच दिसून न आल्याने अखेर अजनी पोलिसांना कैदी पळून गेल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज हस्तगत केल्याचे समजते.

 

 

टॅग्स :Prisonतुरुंगhospitalहॉस्पिटल