शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : पालकमंत्री नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 23:44 IST

विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागपूरसह विभागाचा अग्रक्रम राहील. त्यासाठी सर्व पातळ्यांवर विविध उपक्रमांची निर्धारने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

ठळक मुद्देप्रजासत्ताक वर्धापन दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाविकास आघाडीच्या शासनाने शेतकरी, कामगार आणि तळागाळातील जनतेला सन्मान आणि प्रतिष्ठा देण्यास प्राधान्य दिले आहे. विकासाच्या सर्वच क्षेत्रात नागपूरसह विभागाचा अग्रक्रम राहील. त्यासाठी सर्व पातळ्यांवर विविध उपक्रमांची निर्धारने अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.प्रजासत्ताकाच्या ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम येथील कस्तूरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर त्यांनी सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्वीकारून पथसंचलनाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, खा.डॉ. विकास महात्मे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या सभापती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. या समृद्ध लोकशाही परंपरेचे रक्षण करणे आणि तिला जोपासणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सामाजिक परिवर्तनासाठी जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांनी केलेले कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाहीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.मिलिंद तोतरे, बट्टूलाल पांडे राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानितयावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे आणि बट्टूलाल पांडे यांना उल्लेखनीय पोलीस सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच कुणाल धुरट आणि सुधीर इंगोले यांचाही सन्मान करण्यात आला. याशिवाय डॉ. सीमा रेवाळे, डॉ. सोनाली वानखडे, डॉ. सुचित्रा मनूरकर, डॉ. सुरेश माने, डॉ. हर्षदा फटिंग यांना राष्ट्रीय मूल्यांकन पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. जय कविश्वर, मोहिनी बुटे, मालविका बन्सोड, हर्षदा दमकोंडावार, प्रतिमा बोंडे, यश कांबळे, हिमानी फडके, अभिषेक ठावरे या क्रीडापटूंना तर परीक्षित गोहिया आणि रमेश बंग या क्रीडा मार्गदर्शकांना विविध क्रीडास्तरावर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनNitin Rautनितीन राऊत