शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

कमी खर्चात गुणवत्तापूर्ण रस्ते बांधकामांना प्राधान्य : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 22:17 IST

भारत विकसनशील देश असल्याने आपल्याला आर्थिक मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च (कॉस्ट आॅफ कंस्ट्रक्शन) कमी करत नेऊन बांधकामाची गुणवत्ता वाढविणे म्हणजे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे, हे आमचे प्राधान्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देआयआरसीच्या तांत्रिक प्रदर्शनाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत विकसनशील देश असल्याने आपल्याला आर्थिक मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर मात करण्यासाठी बांधकामांचा खर्च (कॉस्ट आॅफ कंस्ट्रक्शन) कमी करत नेऊन बांधकामाची गुणवत्ता वाढविणे म्हणजे कमी खर्चात गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा आणि रस्ते उभारणे, हे आमचे प्राधान्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यजमानपदाखाली इंडियन रोड काँग्रेसचे ७९ व्या अधिवेशनाला गुरुवारपासून मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या तांत्रिक (टेक्निकल) प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयआरसीचे सेक्रटरी जनरल निर्मल कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी, मुख्य अभियंता आणि आयआरसी आयोजन समितीचे अध्यक्ष उल्हास देबडवार, स्थानिक आयोजन समितीचे सचिव रमेश होतवानी आणि अधीक्षक अभियंता सरदेशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. 
गडकरी म्हणाले, आयआरसीच्या अधिवेशनात तांत्रिक शोधपत्रे आणि नवनवीन तंत्रज्ञान सादर करण्यात येणार आहे. यातून ज्या नियमावली आणि मानके ठरतील, त्याचा फायदा देशातील सर्व राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांना होणार आहे. सोबतच सरकारचा पायाभूत सुविधांवर भर असून टाकाऊ वस्तू, कचरा आणि राखेपासून रस्ते निर्मितीमधील साहित्यांच्या निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये सुमारे २०० स्टॉल्स लावण्यात आले असून यामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान सादर करणारे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी प्रदर्शनीतील विविध स्टॉल्सना भेट दिली आणि माहिती जाणून घेतली. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNitin Gadkariनितीन गडकरी