‘शहजादे हुनर के’ मेगा ऑडिशन ३ रोजी
डान्सिंग, सिंगिंग, मॉडेलिंग करणार मुले अन् युवक : लोकमत कॅम्पस क्लब, फेम ॲण्ड ग्लोरी इव्हेंट्स प्रा. लि व सेंट्रल प्रोव्हिन्शिअल स्कूलचे आयोजन
नागपूर : नव्या वर्षाची सुरुवात उत्साहाने होत आहे. नव्या वर्षात नव्या प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लोकमत कॅम्पस क्लब, फेम अँड ग्लोरी इव्हेंट्स प्रा. लि. आणि सेंट्रल प्रोव्हिन्शिअल स्कूलच्या वतीने ‘शहजादे हुनर के’ मेगा ऑडिशनचे नि:शुल्क आयोजन करण्यात आले आहे. यात मुले व युवकांंसाठी डान्सिंग, सिंगिंग आणि मॉडेलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ३ ते २५ वयोगटातील मुले-मुली यात भाग घेऊ शकतात. ३ जानेवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत ही स्पर्धा होणार आहे. बेसामध्ये वेळाहरी आऊटर रिंग रोड येथील प्रोव्हिन्शिअल स्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. अधिक माहितीसाठी ९८०७७२२२५५, ९३७३२३१४८९ किंवा ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
...........
टीव्ही प्रोमो जाहिरात शुट करण्याची संधी
निवडण्यात आलेल्या कलावंतांना टीव्ही प्रोमो जाहिरातीसाठी शुटिंगची संधी मिळणार आहे. १० जानेवारी २०२१ पासून प्रशिक्षण आणि ग्रुमिंगची सुरुवात होईल. १७ जानेवारी २०२१ ला शुटिंग करण्यात येणार आहे.
............