शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी साधला वीज ग्राहकांशी संवाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून, आतापर्यंत ४७ हजार लाभार्थ्यांना या योजनेत नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. या योजनेचा पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी स्वातंत्राच्या ७० वर्षांनंतर महावितरणने समुद्राच्या तळाशी मरिन केबल टाकून घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे पुन्हा एकदा कौतुक केले.

ठळक मुद्देसौभाग्य योजनेतील कामाबदल महाराष्ट्राचा गौरव : घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचे पुनश्च कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्राने प्रभावी कामगिरी केली असून, आतापर्यंत ४७ हजार लाभार्थ्यांना या योजनेत नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. या योजनेचा पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी स्वातंत्राच्या ७० वर्षांनंतर महावितरणने समुद्राच्या तळाशी मरिन केबल टाकून घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे पुन्हा एकदा कौतुक केले. अशा कामांचा देशाला अभिमान वाटतो, असेही ते यावेळी म्हणाले. घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.सौभाग्य योजनेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लाभार्थीही उपस्थित होते. पंतप्रधानांनी याप्रसंगी महावितरणने केलेल्या घारापुरी बेटाच्या विद्युतीकरण कामाचे विशेषत्वाने कौतुक केले. यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१८ च्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात घारापुरी बेटाच्या उल्लेखनीय कामाचे कौतुक केले होते. नागपूर जिल्ह्यातील सुमारे २५ लाभार्थ्यांशी थेट सवांद साधला. यावेळी कार्यकारी संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, अधीक्षक अभियंता उमेश शहारे. मनीष वाठ, नारायण आमझरे, हरीश गजबे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, दिलीप घाटोळ आदी अधिकारी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानmahavitaranमहावितरण