शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील पवनीच्या मुलांनी तयार केलेल्या पेनचे पंतप्रधानांकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:40 IST

पवनीच्या मुलांनी वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करून पर्यावरणपूरक पेन तयार केला आहे. या संशोधनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. सध्या हा पेन देशातील २२ राज्यात वापरला जात आहे.

ठळक मुद्देपर्यावरणपूरक पेन : वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पवनीच्या मुलांनी वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर करून पर्यावरणपूरक पेन तयार केला आहे. या संशोधनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. सध्या हा पेन देशातील २२ राज्यात वापरला जात आहे.२०१७ मधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नाईट पुरस्कार मिळविणाऱ्या पवनी (भंडारा) येथील पवन पब्लिक स्कूलची १३ वर्षीय विद्यार्थिनी विधी एलसट्टीवार हिने पर्यावरणपूरक पेनच्या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली. गेल्या ३ एप्रिल रोजी संसद भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पेन भेट देण्यात आला. मोदी यांनी हा पेन वापरून या पर्यावरणपूरक संशोधनाची प्रशंसा केली.नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने राष्ट्रपती भवन येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम इग्नाईट पुरस्कारासाठी स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत ‘देशात प्लास्टिकचा वापर कसा कमी करायचा’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. हरियाणा येथील एका विद्यार्थिनीने यासाठी प्लास्टिक पेनाचा वापर थांबवायला हवा अशी भूमिका मांडली. त्यानंतर विधी एलसट्टीवारने वर्तमानपत्राच्या कागदापासून पेन तयार करून दिला. पेनच्या झाकणात तुळशीचे बियाणे टाकले. उपयोग करून पेन जमिनीवर फेकून दिल्यास तुळशीची रोपे तयार व्हावीत हा त्यामागे उद्देश होता. या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला व शाळेच्या विद्यार्थ्यांना पाच हजार पेन तयार करून मागण्यात आले. त्याचवेळी पेनपासून मिळणाºया उत्पन्नाचा गरजूंसाठी उपयोग करण्याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात आला. त्यांनी या उत्पन्नातून शाळेची इमारत बांधण्याचाही निश्चय केला.पर्यावरणपूरक पेन तयार करण्यासाठी गरजू महिलांची सेवा घेतली जात आहे. दोन महिलांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सध्या २६ महिला कार्यरत आहेत. त्यातून महिला ६ ते ७ हजार रुपये मासिक उत्पन्न मिळवून घर सांभाळत आहेत. त्यांनी मुलांना शाळेत टाकले आहे. या पेनमुळे शाळेच्या बांधकामासाठी गेल्या तीन महिन्यांत ५.३२ लाख रुपये मिळाले आहेत. रिसर्च फॉर रिसर्जंस फाऊंडेशन या पेनसाठी बायोडिग्रेडेबल रिफिल तयार करण्याचे संशोधन करीत आहे. ते संशोधन यशस्वी झाल्यास हा पेन १०० टक्के पर्यावरणपूरक होईल. पंतप्रधानांना भेटलेल्या प्रतिनिधी मंडळात शाळेच्या संचालिका वृंदन बावणकर, डॉ. सोनू जेसवानी, डॉ. रेणू बाली, डॉ. इला शुक्ला, डॉ. हंसा शुक्ला व मृणाल दुधे यांचा समावेश होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थी