शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात प्राथमिक शिक्षक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:20 IST

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे रद्द करा या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत हजारो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले.

ठळक मुद्देबदली आणि आॅनलाईन कामाविरोधात शिक्षक रस्त्यावर : आम्हाला फक्त शिकवू द्याची दिली हाक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात बदल करा, शिक्षकांकडील आॅनलाईन कामे रद्द करा या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारत हजारो शिक्षक शनिवारी रस्त्यावर उतरले. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आम्हाला फक्त शिकवू द्या, असा आग्रह शिक्षकांनी प्रशासनाकडे केला.गेल्या सात ते आठ महिन्यापासून शिक्षकांच्या बदल्यांचा विषय राज्यभर गाजत आहे. दरवर्षी शिक्षकांच्या बदल्या मे महिन्यातच होतात आणि जि.प.चे कर्मचारी व शिक्षक यांच्या बदल्या एकाच शासन निर्णयानुसार होतात. परंतु यावर्षी पहिल्यांदाच शिक्षकांच्या बदल्या स्वतंत्र शासन निर्णयानुसार आणि आॅनलाईन पद्धतीने करण्याचे राज्य सरकारने ठरवले. सात आठ महीने उलटूनही बदली प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान या बदली धोरणात काही दुरुस्ती कराव्यात या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. सरकार काहीही ऐकायला तयार नाही.दुसरीकडे मागील चार पाच वर्षापासून शिक्षकांच्या मागे आॅनलाईन कामाचा ससेमिरा सुरू आहे. शाळेत कोणत्याही साधनसुविधा नसताना अनेक अशैक्षणिक स्वरूपाची कामे आॅनलाईन पद्धतीने शिक्षकांना करावी लागतात.ही कामे शिक्षकांकडून करणे थांबवावे व ती कामे स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावी या मागणीसाठी मागील काही दिवसापासून राज्यभर शिक्षकांचे बहिष्कार आंदोलन सुरू आहे. त्यातच वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी बाबत जाचक अटी असलेला शासन निर्णय शासनाने निर्गमित केला त्यामुळे शिक्षकांमधील असंतोष अधिकच वाढला.हा असंतोष आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला. जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी १ वाजता यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा संविधान चौकात पोहचला. त्या ठिकाणी झालेल्या सभेत शिक्षक नेत्यांची जोरदार भाषणे झाली.मोर्चाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केले. यात सुनील पेटकर, सुनील पाटील, तुषार अंजनकर, राजकुमार वैद्य, शरद भांडारकर, शेषराव कांबळे, स्वाती लोन्हारे, मनोज घोडके, सुधाकर मते आदी वेगवेगळ्या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.यावेळी शासनाने जर मागण्यांची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच संकलित चाचणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.