शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

नागपुरात राख्यांच्या किमतीत २० टक्के वाढ, कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:20 IST

राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

ठळक मुद्देरजवाडी, स्टोन, कुंदन राख्यांना मागणी : खरेदीचा उत्साह वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रत्येक भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये अन्य सणांइतकेच या पारंपरिक सणाला महत्त्व आहे. काळानुसार या सणाचा ट्रेंड बदलला असला तरी लहान मुलामुलींपासून वृद्ध भावाबहिणींमध्येही रक्षाबंधनाचा उत्साह कायम असतो. यावर्षी रविवार, २६ आॅगस्टला रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. यंदा रजवाडी, स्टोन आणि कुंदन राख्यांना चांगली मागणी आहे. फॅन्सी, स्टायलिश राख्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. आतापर्यंत ठोक बाजारात ८० टक्के स्टॉक विकण्यात आला आहे. युवती आणि महिलांची आकर्षक व अनोखे रंग, डिझाईन आणि पॅटर्नला जास्त पसंती आहे. शुक्रवारी महिलांनी इतवारी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती. राख्यांसोबत ग्रिटिंग कार्डला चांगली मागणी आहे. खरेदी करताना किमतीऐवजी रंगसंगतीला जास्त पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.२ ते ५०० रुपयांची राखीबाजारपेठेत धाग्यापासून तयार केलेल्या राखीची किंमत दोन रुपयांपासून आहे. याशिवाय अनोख्या राख्या ५०० रुपयांपर्यंत आणि सराफांच्या दुकानात चांदीच्या राख्या पाच हजार रुपयांपर्यंत विक्रीस आहेस. दिवसेंदिवस राख्यांचा बाजार वाढत आहे. तुळशीचे मणी, रुद्राक्षांचा वापर केलेल्या राख्या बाजारात विक्रीस आहेत. लहान मुलांची कार्टुन राख्यांना पसंती आहे. इतवारीतील विक्रेत्याने सांगितले की, नागपुरातील व्यापारी मुंबई, अहमदाबाद, कोलकाता येथून कोट्यवधींच्या राख्या मागवितात. यंदा भाववाढीनंतरही व्यवसायात उत्साह आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने व्यवसाय होण्याचे संकेत आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लोकांमध्ये या सणाविषयी उत्साह दिसून येत आहे.हॅण्डमेड राख्यांना पसंतीनागपुरात हॅण्डमेड राख्यांची निर्मिती गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. या राख्यांना सर्वस्तरातून मागणी दिसून येत आहे. गृहउद्योग करणाऱ्या महिला आणि बचत गटांतर्फे या राख्या तयार करण्यात येतात. सहा महिन्यांपासून राख्या तयार करण्याला सुरुवात होते. हॅण्डमेड राख्या निर्मितीला वेळ जास्त लागत असल्यामुळे हव्या तेवढ्या राख्यांची निर्मिती होत नाही, असे महिला बचत गटाच्या संचालकांनी सांगितले.रक्षाबंधनात चॉकलेटची दुनियारक्षाबंधन सणात गोड पदार्थांची जागा आता चॉकलेटनी घेतली आहे. खास रक्षाबंधनासाठी बाजारात नामांकित कंपन्यांनी चॉकलेटच्या अनेक व्हेरायटीज दाखल केल्या आहेत. ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या चॉकलेटचे रक्षाबंधनासाठी तयार केलेले बॉक्सेस मिठाईच्या दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहेत. हे चॉकलेट लहानांबरोबरच तरुणांमध्येही लोकप्रिय ठरले आहेत. पेढे, जिलेबी, रसमलाई, श्रीखंड या पदार्थांपेक्षा रक्षाबंधनासाठी चॉकलेटलाच अधिक पसंती दिली जात असून रक्षाबंधनापूर्वी चॉकलेट खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. 

 

टॅग्स :Rakhiराखीnagpurनागपूर