शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तूर, मूग, उडीदच्या आयातीवर निर्बंध, डाळींचे भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 01:02 IST

शेतकऱ्यांना कच्च्या मालाची जास्त किंमत मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध १ एप्रिलपासून पुन्हा एक वर्षांसाठी वाढवून पूर्वीप्रमाणे कोटा पद्धती आणली आहे. त्यामुळे विदेशातून कच्च्या मालाची आयात ७० ते ८० टक्के कमी होणार असून यंदाच्या हंगामात सर्व डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीची झळ ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. आठ दिवसांत किरकोळमध्ये चांगल्या प्रतीच्या तूर डाळीचे दर प्रति किलो ८५ रुपयांवर पोहोचले आहेत.

ठळक मुद्देतुरीचे कमी उत्पादन : भाववाढीचा ग्राहकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना कच्च्या मालाची जास्त किंमत मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध १ एप्रिलपासून पुन्हा एक वर्षांसाठी वाढवून पूर्वीप्रमाणे कोटा पद्धती आणली आहे. त्यामुळे विदेशातून कच्च्या मालाची आयात ७० ते ८० टक्के कमी होणार असून यंदाच्या हंगामात सर्व डाळींचे दर वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीची झळ ग्राहकांच्या खिशाला बसणार आहे. आठ दिवसांत किरकोळमध्ये चांगल्या प्रतीच्या तूर डाळीचे दर प्रति किलो ८५ रुपयांवर पोहोचले आहेत.कोट्यामुळे मिळणार अपुरा साठासरकारने कडधान्याच्या कच्च्या मालावर निर्बंध आणले, पण दाल मिलला कच्चा माल मिळावा म्हणून कोटा पद्धती आणली. सरकार २ लाख टन तूर, १.५० लाख टन उडद आणि १.५ लाख टन मूग आयात करणार आहे. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या एकत्रित मागणीनुसार सरकार प्रत्येकाला ठराविक कच्चा माल देणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे कडधान्याच्या कच्च्या मालाचे भाव वाढले आहे. पण शेतकऱ्यांनाही कच्च्या मालाला चांगला भाव मिळत आहे.कंपन्या खरेदी करताहेत तूरदेशातील मोठ्या कंपन्यांनीही पॅकिंगमध्ये डाळ विक्री सुरू केली आहे. या कंपन्या थेट शेतकऱ्यांकडून जास्त भावात तूर खरेदी करीत असल्यामुळे स्थानिक दाल मिलला मुबलक तूर मिळणे कठीण झाले असून जास्त भावात खरेदी करावी लागत आहे. सरकारने आयातीवर निर्बंध टाकल्यामुळे मोठ्या कंपन्या आयातमुक्त अफ्रिकन देशातून कच्च्या मालाची आयात मोठ्या प्रमाणात करीत आहे. स्पर्धेत दाल मील चालविणे कठीण झाल्याचे दाल मील संचालक बळवंत अग्रवाल यांनी सांगितले.आयातीचे प्रमाण घटलेकडधान्याच्या कच्च्या मालाची सर्वाधिक आयात म्यानमार येथून होते. एक वर्षापूर्वी भारतात १० लाख टन तूर, ६ ते ७ लाख टन मूग आणि ७ ते ८ लाख टन उडीद, ऑस्ट्रेलियातून १० ते १२ लाख टन चणा आणि कॅनडातून २० ते २२ लाख टन वाटाणा आयात व्हायचा. पण आता निर्बंधानंतर आयात १५ ते २० टक्क्यांवर आली आहे.सरकारकडे तुरीचा साठादोन वर्षांपूर्वी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यानंतर शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून सरकारने तुरीची खरेदी केली. ही खरेदी गेल्यावर्षीही सुरू होती. त्यामुळे सरकारकडे तुरीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. आयातीवर निर्बंध आणल्यानंतर यावर्षी सरकार तूर दाल मीलला देणार आहे. ही प्रक्रिया लवकर व सुलभ झाली तर तूर डाळीचे भाव आटोक्यात राहतील, असे अग्रवाल यांनी सांगितले.१०० दाल मील बंदनागपुरात पाच वर्षांपूर्वी २०० पेक्षा जास्त दाल मील होत्या. पुरेसा कच्चा माल आणि दोन वर्षांपासून तूर डाळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे १०० पेक्षा जास्त दाल मील बंद पडल्या आहे. शिवाय आयातीला थेट परवानगी नसल्यामुळे कच्चा माल मिळणे कठीण झाले आहे. नंतरच्या काळात किती दाल मील सुरू राहतील, हे सांगणे कठीण असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.तूर डाळींचे दर वाढणारगेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी पावसामुळे तुरीचे उत्पादन कमी झाले आहे. शिवाय सरकारने आयातीवर निर्बंध आणून कोटा पद्धती जारी केली आहे. त्यामुळे दाल मीलला हव्या त्या प्रमाणात तूर मिळणार नाही. आफ्रिकन देशातून तूर, मूग आणि उडदाच्या आयातीला परवानगी दिली आहे. पण या ठिकाणाहून आयात महाग पडते. निश्चित कोट्यामुळे दाल मीलला सरकारकडे मागणी करावी लागणार आहे. त्यामुळे तुरीचे दर वाढतील. दाल मीलला क्षमतेच्या तुलनेत कमी तूर मिळाल्यामुळे डाळीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.बळवंत अग्रवाल, अध्यक्ष,विदर्भ दाल मील असोसिएशन.

टॅग्स :foodअन्नInflationमहागाई