शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उन्हानंतर वाढणार तुरीचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:32 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीची लागवड जास्त असली तरीही पावसामुळे बरेच पीक खराब झाले आहे.

ठळक मुद्देसोयाबीनचे भाव उतरलेआवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यात सध्या आर्द्रता असलेली आणि नरम तुरीची आवक १० दिवसांपासून सुरू आहे. आतापर्यंत १८ ते २० हजार क्विंटल तूर बाजारात विक्रीस आली. उन्हानंतर भाव वाढण्याची शक्यता आहे.

गावराणी तुरीला मागणीकळमना धान्य बाजाराचे अडतिया कमलाकर घाटोळे म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीची लागवड जास्त असली तरीही पावसामुळे बरेच पीक खराब झाले आहे, शिवाय नवीन तूर बाजारात येण्यास उशीर झाला. दहा दिवसांपासून आवक सुरू असून उन्हानंतर भाववाढीची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच काळात ५,२०० ते ५,३०० रुपये भाव होते. नागपुरी गावराणी तूर बारीक आणि स्वादिष्ट असते. त्यामुळे अन्य राज्यात जास्त मागणी आहे. कळमन्यात नागपूर जिल्ह्यातून काटोल, सावनेर, मौदा, कुही, मांढळ, उमरेड, गुमथळा येथून आणि हिंगणघाट व मध्य प्रदेशातून तूर विक्रीस येते. खरेदीचा सीझन मार्च-एप्रिलपर्यंत असतो. तसे पाहता खरेदी वर्षभर सुरू असते. कमी उत्पादन आणि मागणी वाढल्यानंतर तुरीचे भाव आणखी वाढू शकतात, असे घाटोळे म्हणाले.त्याचप्रमाणे यावर्षी हरभऱ्याचा पेरा जास्त असला तरीही पावसामुळे ५० टक्के माल खराब झाला आहे. नवीन माल येण्याच्या शक्यतेने ४,३०० रुपयांवर पोहोचलेले भाव कमी झाले आहेत. सध्या जुन्या हरभºयाची विक्री सुरू असून, भाव प्रति क्विंटल ३,८०० ते ३,९०० रुपयादरम्यान आहे.

‘कोरोना’च्या भीतीने सोयाबीनच्या भावात घसरणकोरोना व्हायरसची भीती भारतात दिसून येत आहे. पशुखाद्य म्हणून सोयाबीन ढेपचा कुक्कुटपालन उद्योगात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. चिकनची मागणी कमी झाल्याचा परिणाम पशुखाद्याच्या विक्रीवर झाला आहे. १०० किलो सोयाबीनपासून १७ ते १८ टक्के खाद्यतेल आणि ६५ टक्के ढेप (डीओसी) निघते. ढेपची मागणी कमी झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती