सिलिंडरचे दर वाढले, सबसिडी मात्र जुनीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 10:33 PM2020-12-19T22:33:06+5:302020-12-19T22:34:41+5:30

price of cylinder has gone up,subsidy old, nagpur news विना अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत वाढविल्यानंतर सबसिडी वाढते, असा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण डिसेंबर महिन्यात १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही ग्राहकांच्या बँक खात्यात नोव्हेंबरएवढीच ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असून तेल कंपन्यांचा अजब न्याय असल्याचे सांगत दाद कुणाकडे मागावी, अशी सवाल उपस्थित करीत आहेत.

The price of cylinder has gone up, but the subsidy is old! | सिलिंडरचे दर वाढले, सबसिडी मात्र जुनीच!

सिलिंडरचे दर वाढले, सबसिडी मात्र जुनीच!

Next
ठळक मुद्देतेल कंपन्यांचा अजब न्याय : ग्राहकांमध्ये संभ्रम

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : विना अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत वाढविल्यानंतर सबसिडी वाढते, असा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण डिसेंबर महिन्यात १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही ग्राहकांच्या बँक खात्यात नोव्हेंबरएवढीच ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असून तेल कंपन्यांचा अजब न्याय असल्याचे सांगत दाद कुणाकडे मागावी, अशी सवाल उपस्थित करीत आहेत. वाढीव किमतीनुसार १४० रुपये सबसिडी बँक खात्यात जमा व्हायला हवी, हे विशेष.

नोव्हेंबरमध्ये विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत ६४६ रुपये होती. तेव्हा बँक खात्यात ४०.१० रुपये सबसिडी जमा व्हायची. त्यानंतर २ डिसेंबरला सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढून ६९६ रुपयांवर गेले. तेव्हाही ग्राहकांच्या बँक खात्यात ४०.१० रुपये सबसिडी जमा झाली. त्यानंतर १५ डिसेंबरला सिलिंडर पुन्हा ५० रुपयांनी दर वाढले आणि किंमत ७४६ रुपयांवर पोहोचली. त्यानंतर ४०.१० रुपये सबसिडी बँक खात्यात जमा झाल्याचे मॅसेज ग्राहकांना येत आहेत. अर्थात सिलिंडरचे दर ६४६ रुपये असताना ४०.१० रुपये सबसिडी, ६९६ रुपयावर गेल्यावरही तेवढीच आणि ७४६ रुपये झाल्यावरही ४०.१० रुपये सबसिडी जमा होत असल्याने ग्राहक संभ्रमात आहेत. सिलिंडरचे दर वाढल्यानंतर सबसिडी वाढीव किमतीच्या प्रमाणात जमा होत असल्याचा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण जास्त सबसिडी का जमा होत नाही, हा गंभीर प्रश्न आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर कंपनीचे अधिकारी म्हणाले, केवायसीच्या अटी पूर्ण केलेल्या ग्राहकांच्या बँक खात्यात तेल कंपन्यांच्या अटीनुसार सबसिडी जमा होते. सिलिंडरच्या किमतीनुसार सबसिडी कमी-जास्त होत असते. डिसेंबरमध्ये दोनदा किमती वाढूनही सबसिडी का वाढली नाही, यावर भाष्य करता येणार नाही. हे सर्वस्वी तेल कंपन्यांच्या हातात आहे. ज्यांना कमी सबसिडी जमा झाल्याचे मॅसेज आले, त्यांच्या खात्यात पुन्हा सबसिडी जमा होऊ शकते.

सबसिडीचा फायदा नाही

विनाअनुदानित सिलिंडरची १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही बँक खात्यात नोव्हेंबरच्या किमतीएवढीच ४०.१० रुपये सबसिडी जमा होत आहे. केंद्र सरकार वाढीव दराचा ग्राहकांना फायदा न देता त्यांच्या खिशातून १०० रुपये जास्तीचे काढत आहे. हे चुकीचे आहे. सरकारने सबसिडी वाढवावी आणि ग्राहकांना न्याय द्यावा.

अश्विनी खवसे, गृहिणी.

सिलिंडर दरवाढीसोबतच सबसिडी वाढवावी

पूर्वी सिलिंडरचे दर ८०० रुपयांवर गेले होते तेव्हा २०० रुपयांपर्यंत सबसिडी जमा व्हायची. आता ७४६ रुपयांवर दर गेल्यानंतरही बँक खात्यात ४०.१० रुपयेच सबसिडी जमा झाली आहे. यासंदर्भात वितरक उत्तर देण्यास तयार नाही. अधिकाऱ्यांना विचारून सांगतो, असे उत्तर मिळाले. सरकारने सिलिंडरच्या दरवाढीसोबतच सबसिडी वाढवावी.

ज्योती डोंगरे, गृहिणी.

Web Title: The price of cylinder has gone up, but the subsidy is old!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.