शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

नागपुरात सुपारीच्या किमतीत १०० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:13 IST

दोन वर्षांपासून केरळ आणि मंगलोर येथे पुरामुळे सुपारी पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादन आणि आवक कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दहा दिवसात सुपारीच्या किमतीत प्रति किलो ४० रुपयांची वाढ झाली असून किरकोळमध्ये किमती १०० रुपयांनी वधारल्या आहेत.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा पिकांना फटकाउत्पादन आणि आवक कमी, उलाढाल मंदावली

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन वर्षांपासून केरळ आणि मंगलोर येथे पुरामुळे सुपारी पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादन आणि आवक कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दहा दिवसात सुपारीच्या किमतीत प्रति किलो ४० रुपयांची वाढ झाली असून किरकोळमध्ये किमती १०० रुपयांनी वधारल्या आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे. त्यामुळे उलाढाल मंदावली आहे.

पांढऱ्या सुपारीचा ९० टक्के उपयोगइतवारी चिल्लर किराणा असोसिएशनचे सचिव आणि सुपारीचे ठोक व्यापारी शिवप्रताप सिंह यांनी सांगितले की, पांढऱ्या सुपारीचे सर्वाधिक उत्पादन केरळ, मंगलोर या राज्यांमध्ये तर गोवा व तामिळनाडू येथे कमी होते. याशिवाय लाल सुपारी आसाम, मिझोरममध्ये होते. लाल सुपारीचा उपयोग फार कमी होतो. यावर्षीही केरळ आणि मंगलोर येथे अनेक दिवस पूर आणि परतीच्या पावसामुळे सुपारी पिकाला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे आवक अर्ध्यावर आली. देशात ९० टक्के पांढरी सुपारी विकली जाते. पूजा, पान, गुटखा यात पांढऱ्या सुपारीचा उपयोग होतो.यावर्षी पांढऱ्या सुपारीच्या पिकांना फटका बसल्यामुळे गेल्या दहा दिवसात ठोक आणि चिल्लर बाजारात वाढ झाली आहे. दररोज ४ कोटींचा व्यवसाय १ कोटींवर, जीएसटीचा फटकाव्यवसाय इंदूर स्थलांतरित झाल्यामुळे इतवारी बाजारपेठेतील दररोज ४ कोटींपेक्षा जास्त होणारी सुपारीची उलाढाल आता १ कोटीवर आली आहे. केरळचे इतवारी बाजारात व्यवसाय करणाऱ्या ४० व्यापाऱ्यांपैकी आता २२ ते २३ जण व्यवसाय करीत आहेत. याशिवाय या व्यवसायाला जीएसटीचा फटका बसला आहे. देशात सुपारीवर ५ टक्के जीएसटी आकारला जातो. दोन वर्षांपूर्वी केरळ आणि मंगलोरची सुपारी नागपुरात यायची आणि येथून संपूर्ण देशात वितरित व्हायची. पण समान जीएसटीमुळे व्यापारी थेट केरळमधून सुपारी मागवितात.

नागपूरची बाजारपेठ इंदूर येथे स्थलांतरितनागपूर ही सुपारीची मध्य भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ होती, पण गेल्या दोन वर्षांत सुपारी व्यापाऱ्यांवर शासनाच्या धाडी आणि असामाजिक तत्त्वांच्या अवैध वसुलीच्या त्रासामुळे येथील इतवारीतील ६० घाऊक व्यापाऱ्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय इंदूरला स्थलांतरित केला आहे. व्यापारी नागपुरातच बसतात, पण गोदामांमध्ये सीसीटीव्ही बसवून नागपुरातून इंदूरमध्ये व्यवसाय करतात. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी दररोज १० ते १२ ट्रकचा (प्रति ट्रक १६ टन) व्यवसाय आता दोन ते तीन ट्रकवर आला आहे.

वार्षिक १० ते १२ हजार कोटींचा व्यवसाय ३ हजार कोटींवरसुपारी नागपुरात विक्रीसाठी येण्याचे प्रमाण कमी झाले. उदाहरण द्यायचे झाल्यास नागपूर ते कानपूर सुपारी वाहतुकीचे भाडे प्रति किलो ३.५ रुपये आहे तर केरळ ते कानपूर वाहतुकीचे भाव ४ रुपये आहे. त्यामुळेच कानपूर येथील व्यापारी आता थेट केरळमधून सुपारी खरेदी करीत आहेत. सध्या या व्यवसायात गुंतवणुकीच्या तुलनेत नफा कमी झाला आहे. शिवप्रताप सिंह म्हणाले, सन १९९७ मध्ये सुपारीचे भाव दर्जानुसार ५० ते १०० रुपये प्रति किलो होते. हे भाव २००१ पर्यंत स्थिर होते. पण आता ठोकमध्ये २६० रुपये तर किरकोळमध्ये ३६० रुपयांवर गेले आहेत.

डिसेंबरमध्ये भाव कमी होणारडिसेंबरमध्ये नवीन सुपारी बाजारात येणार आहे. आता थोडीफार आवक सुरू झाली आहे. आवक पूर्णपणे सुरू झाल्यानंतर भाव २० ते ३० रुपयांनी कमी होईल, पण किरकोळमध्ये एकदा वाढलेले भाव कमी होण्याची शक्यता नाही. इंडोनिशिया देशातून सुपारीच्या आयातीवर १५० टक्के आयात शुल्क आहे. त्यामुळे काही व्यापारी चोरट्या मार्गाने सुपारीची आयात करायचे. पण धाडसत्रानंतर सुपारी जप्त होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे चोरट्या मार्गाने सुपारी मागविणे बंद केले आहे. सरकारने सुपारीवरील आयात शुल्क कमी केल्यास देशांतर्गत भाव कमी होतील, असे शिवप्रताप सिंह म्हणाले.

टॅग्स :Marketबाजार