शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

भांडेवाडी डंपिंग यार्डचे प्रदूषण रोखा

By admin | Updated: November 9, 2014 00:50 IST

भांडेवाडी डंपिंग यार्डमुळे पसरत असलेले प्रदूषण आणि दुर्गंधीच्या समस्येसाठी ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी डंपिंग यार्ड परिसरात धरणे आंदोलन केले.

नागरिकांचे आंदोलन : उमेश चौबेंनी जाणून घेतल्या समस्यानागपूर : भांडेवाडी डंपिंग यार्डमुळे पसरत असलेले प्रदूषण आणि दुर्गंधीच्या समस्येसाठी ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी डंपिंग यार्ड परिसरात धरणे आंदोलन केले.प्रदूषण आणि घाणीची माहिती घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे पीडित नागरिकांच्या आग्रहास्तव डंपिंग यार्ड परिसरात गेले. त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर गुरव, नरेश निमजे, अविनाश निमकर, मनोहर पराते होते. यावेळी वस्तीतील त्रस्त नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी नागरिकांनी सांगितले की, डंपिंग यार्डचा कचरा साफ करणारा कारखाना महापालिकेसाठी समस्या झाला आहे. कारखान्यात दोन वेळा आग लागून तो बंद पडला आहे. परिसरात माती मिळविलेला कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे सर्वत्र धूर पसरतो. रस्त्यावरील लाईट बंद पडले असून त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या विविध हॉस्पिटलमधील कचरा, मांस, हाडे, मांसाचे गोळे जाळण्याची व्यवस्था असल्यामुळे वस्तीतील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. याच परिसरात शहरातील मोकाट कुत्रे पकडून सोडण्यात येतात. त्यामुळे परिसरात कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिक भयग्रस्त झाले आहेत. ते मेलेली जनावरे रस्त्यावर, वस्तीत आणतात. येथे मल शुद्धीकरण केंद्र चालते. त्याची क्षमता कमी असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डेंग्यू, दम्याचा आजार पसरत आहे. यावेळी परिसरात चुकीच्या वेळी वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे पाहून उमेशबाबू चौबेंनी तेथेच धरणे आंदोलन केले. याबाबत माहिती मिळताच महापौर आणि त्यांची चमू पोलिसांसह तेथे पोहोचली. त्यांनी नागरिकांना समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भांडेवाडीच्या प्रकल्पाला उमरेड रोडवरील पाचगाव येथे स्थानांतरित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान महापौरांनी भांडेवाडी डंपिंग यार्डमधील प्रदूषणाबाबत १० नोव्हेंबरला बैठक आयोजित केली आहे. धरणे आंदोलनात सचिन काळबांडे, किशोर सोनवणे, नरेश ठाकरे, शेख मुश्ताक, केशव चौधरी, रंजित राऊत, मो. जलील, सुरेश रोकडे, विकास बादलवार, जयप्रकाश भरडकर, नरेंद्र बर्वे, मंगला भागवतकर, नंदा गुमगावकर, दुर्गा चव्हाण आदींनी महापौरांपुढे आपल्या समस्या मांडल्या. (प्रतिनिधी)